पाचगावसह शुक्रवार पेठेत वाहने पेटवण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:25 IST2020-12-31T04:25:36+5:302020-12-31T04:25:36+5:30

कोल्हापूर : पाचगाव व शुक्रवार पेठ दोन ठिकाणी पेट्रोल टाकून दोन वाहने पेटविण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या. याबाबत पोलीस ...

Type of burning of vehicles in Peth including Pachgaon | पाचगावसह शुक्रवार पेठेत वाहने पेटवण्याचा प्रकार

पाचगावसह शुक्रवार पेठेत वाहने पेटवण्याचा प्रकार

कोल्हापूर : पाचगाव व शुक्रवार पेठ दोन ठिकाणी पेट्रोल टाकून दोन वाहने पेटविण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

शहरात शुक्रवार पेठेतील जोशी गल्लीत विनायक यशवंत वासुदेव (वय २८) यांनी आपल्या घरासमोर दुचाकी उभी केली होती. अज्ञाताने बुधवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवर पेट्रोल टाकून ती पेटवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये दुचाकीचे जळून सुमारे १५ हजारांचे नुकसान झाले. याची नोंद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.

दरम्यान, शहरानजीक पाचगाव (ता. करवीर) येथेही उभ्या केलेल्या रिक्षाच्या सीटवर बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञाताने पेट्रोल टाकून पेटवली. सुदैवाने रिक्षाची फक्त सीटच पेटली. यामध्ये सुमारे दिड हजार रुपयेचे नुकसान झाले. याबाबत रिक्षामालक प्रदीप गणपतराव जाधव (वय ४२, रा. हरि मंदिर, रामानंदनगर) यांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या वाहने पेटवणाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Type of burning of vehicles in Peth including Pachgaon