दोन युवक धडकलेला डंपर उलटून क्लीनर जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:26 AM2021-09-25T04:26:24+5:302021-09-25T04:26:24+5:30

मलकापूर : मलकापूर - अणुस्कुरा राज्यमार्गावरील माण (ता. शाहूवाडी ) गावच्या हद्दीतील चक्री वळणावर डंपर उलटून ...

Two youths overturned a hit dumper and the cleaner died on the spot | दोन युवक धडकलेला डंपर उलटून क्लीनर जागीच ठार

दोन युवक धडकलेला डंपर उलटून क्लीनर जागीच ठार

Next

मलकापूर : मलकापूर - अणुस्कुरा राज्यमार्गावरील माण (ता. शाहूवाडी ) गावच्या हद्दीतील चक्री वळणावर डंपर उलटून झालेल्या अपघातात डंपरमधील क्लीनर प्रतीक विलास पाटोळे (वय २०, रा. केरेवाडी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली ) हा जागीच ठार झाला, तर चालक राहुल शंकर बंडगर (३०, रा म्हैसाळ, ता. मिरज, जि. सांगली) हा गंभीर जखमी झाला. अपघाताची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे. या अपघातग्रस्त डंपरला दोन दिवसांपूर्वी मांजरे येथील दोन युवकांची मोटारसायकल धडकून त्यांचा मृत्यू झाला होता. तो डंपर शाहूवाडी पोलीस स्टेशनला आणताना ही घटना घङली

करंजफेण - येळवण जुगाई मार्गावर मौसम गावच्या हद्दीतील रस्त्याकडेला उभ्या असलेल्या डंपरला मांजरे येथील युवक बाळासाहेब भातडे व सचिन शेलार हे मोटारसायकलवरील दोन युवक धडकून जागीच ठार झाले होते. या अपघातातील डंपरचा पंचनामा शाहूवाडी पोलिसांनी केला होता. चालक राहुल बंडगर याला पोलिसांनी डंपर शाहूवाडी पोलीस स्टेशनला घेऊन या, असे सांगितले होते. चालक डंपर घेऊन अणुस्कुरा - मलकापूर राज्यमार्गावरून येत असताना, माण गावच्या हद्दीतील चक्री वळणावर चालकाचा डंपरवरील ताबा सुटल्याने डंपर उलटला. या अपघातात क्लीनर जागीच ठार झाला, तर चालक गंभीर जखमी झाला. अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय पाटील करीत आहेत.

Web Title: Two youths overturned a hit dumper and the cleaner died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app