इचलकरंजीत दोन तरुणांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:26 IST2021-08-15T04:26:21+5:302021-08-15T04:26:21+5:30
येथील काडापुरेतळ परिसरातील नीलेश अनिल कोळी (वय २३) याने राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. तो ऑटोलूमवर मिळेल ...

इचलकरंजीत दोन तरुणांची आत्महत्या
येथील काडापुरेतळ परिसरातील नीलेश अनिल कोळी (वय २३) याने राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. तो ऑटोलूमवर मिळेल तेथे कामगार म्हणून काम करत होता. शनिवारी दुपारी नीलेश घरीच होता. त्याचे वडील अनिल मारुती कोळी (वय ४१) हे सायझिंग कामगार आहेत. ते कामावर गेले होते. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अनिल यांना मुलगा नीलेश याने घरातील छताच्या लोखंडी अँगलला गळफास लावून घेतल्याचे समजले. त्यांनी पोलिसात वर्दी दिली.
दरम्यान, कुडचे मळा परिसरातील आकाश दीपक यादव (वय २२) यानेही राहत्या घरी किचनमध्ये छताच्या हुकास साडीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. आकाश हा प्रोसेस कामगार होता. आज सायंकाळी घरी कोणी नसल्याचे पाहून आकाशने आत्महत्या केली. याबाबतची वर्दी रवींद्र महिपती माळी (वय ३३) यांनी पोलिसात दिली आहे. दोन्ही आत्महत्यांच्या घटनांमध्ये साधर्म्य असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. दोन्ही घटनांमधील आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.