शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: दुचाकी चोरली, घरफोडी केली; सीसीटीव्ही फुटेजमध्ये कॅच झाला.. अन् चोरटा सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 18:21 IST

दोन दिवसांची पोलिस कोठडी

पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील बांदिवडेतील दुचाकी आणि निकम वाडीतील घरफोडी करून साडेतील लाखांची चोरी करणाऱ्या परराज्यातील चोरट्याला मुद्देमालासह पन्हाळा पोलिसांनी हुक्केरीतील राहत्या घरातून ताब्यात घेतले. आनंद सोमाप्पा सुटकन्नावर (२८, रा. अर्जुनवाडा रोड हुक्केरी, जि. बेळगाव) असे चोरट्याचे नाव आहे. सोमवारी (दि. ८) चोरट्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक अण्णासो बाबर यांनी दिली. सीसीटीव्ही आणि गोपनीय बातमीदाराकडून दोन घरफोडी आणि दुचाकी अशा तीन चोऱ्यांचा छडा पन्हाळा पोलिसांनी लावला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबरच्या रात्री चोरट्याने शाहूवाडी तालुक्यातील घुंगूर गावातील किराणामालाच्या दुकानातील २४ हजार चोरून पुढील प्रवासासाठी गावातील दुचाकी चोरली. चावरे फाट्यावर गाडीतील तेल संपल्याने ती गाडी तेथे सोडली. चोरटा चालत बांदिवडे येथे आला. त्याने बांदिवडेतील संग्राम भोसलेची दुचाकी चोरून निकमवाडीत आला. निकमवाडीतील बाहेरगावी राहणारे नितीन माने यांच्या घराचे कुलूप मोडून सोन्यासह २२ हजार रोकड चोरली. त्याच गावातील नातेवाइकांकडे गेलेल्या मालूबाई यांच्या घराचे कुलून फोडून घरातील दीड तोळ्याचा ऐवज चोरला. चोरट्याने दोन्ही घरांतून ३ लाख ५५ हजार रुपयांची चोरी केली.पन्हाळा पोलिस समीर मुल्ला आणि संतोष वायदंडे यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्याचा घुंगूर ते हुक्केरीपर्यंत मार्ग ४० सीसीटीव्हीद्वारे तपासला आणि खबऱ्याच्या माहितीच्या आधारे पोलिस चोरट्याच्या घरापर्यंत पोहाेचले. पन्हाळा पोलिसांनी संशयित चोरट्याला घरातून ताब्यात घेऊन कारवाई केली. पोलिसांनी चोरट्याने चोरलेल्या मुद्देमालपैकी दुचाकीसह १ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. संशयित आनंद सुटकन्नावर याच्याकडून आणखी काही चोरीच्या गुन्ह्यांची उकल होणार असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.चोरट्याने २३ नोव्हेंबरला शाहूवाडीतील घुंगूर गावातील दुकानासह एक घरफोडी केली होती. त्याने दुकानातून २४ हजार चोरले होते तर घरात काहीच सापडले नसल्याचे पोलिस जबाबात सांगितले आहे. घुंगूरमधून बाहेर पडताना गावातील दुचाकी चोरली. त्यामुळे परराज्यातील चोरट्याने यापूर्वी शाहूवाडी तालुक्यात अजून कोठे घरफोड्या केल्या आहेत का? शिवाय घुंगूर गावातील केलेल्या दुकान, घरफोडीसह पळून जाण्यासाठी चोरलेल्या दुचाकीच्या पुढील तपासासाठी चोरट्याला शाहूवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.