भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:26 IST2021-03-01T04:26:46+5:302021-03-01T04:26:46+5:30
कोल्हापूर : वाघबीळ घाट ते पडवळवाडी या पन्हाळा मार्गावर भरधाव मोटारीने पाठीमागून दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये वृद्धाचा मृत्यू झाला, ...

भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
कोल्हापूर : वाघबीळ घाट ते पडवळवाडी या पन्हाळा मार्गावर भरधाव मोटारीने पाठीमागून दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये वृद्धाचा मृत्यू झाला, तर दुसरा स्वार गंभीर जखमी झाला. रंगराव राऊजी पाटील (वय ६५ रा. धबधवेवडी, ता. पन्हाळा) असे मृताचे नाव आहे, तर बाजीराव तुकाराम पाटील (वय ५९ रा. आरळे, ता. पन्हाळा) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी मोटरचालक बाजीराव तुकाराम पाटील (वय ५९ रा. आरळे, ता. पन्हाळा) यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बाजीराव पाटील व रंगराव पाटील हे दोघे आपल्या दुचाकीवरून कोल्हापूरच्या दिशेने येत होते, त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात रंगराव पाटील हे गंभीर जखमी झाले, त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला, तर जखमी बाजीराव पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी झालेल्या तक्रारीवरून मोटारचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे.