दोन दुचाकींची समोरासमोर धडक, देवाळेनजीक अपघात, तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 05:49 PM2020-03-25T17:49:43+5:302020-03-25T17:51:01+5:30

कोल्हापूर ते हळदी मार्गावर भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले. ही दुर्घटना देवाळे (ता. करवीर) येथे घडली.

Two-wheeler face-to-face collision, three accidentally injured: two elderly | दोन दुचाकींची समोरासमोर धडक, देवाळेनजीक अपघात, तिघे जखमी

दोन दुचाकींची समोरासमोर धडक, देवाळेनजीक अपघात, तिघे जखमी

Next
ठळक मुद्देदोन दुचाकींची समोरासमोर धडकदेवाळेनजीक अपघात : दोन वृद्धांसह तिघे जखमी

कोल्हापूर : कोल्हापूर ते हळदी मार्गावर भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले. ही दुर्घटना देवाळे (ता. करवीर) येथे घडली.

वसंत गोविंद कांबळे (वय ८०, रा. देवाळे), प्रसाद उदय कुलकर्णी (२५), उदय गोपाळ कुलकर्णी (६२, दोघेही रा. पुईखडी, ता. करवीर) अशी जखमींची नावे आहेत.

कुलकर्णी पिता-पुत्र हे हळदी गावाहून कोल्हापूरला येत होते. त्यावेळी सुरेश कांबळे व वसंत गोविंद कांबळे हे दुचाकीवरून कोल्हापूरहून देवाळे गावाकडे जात होते. यावेळी दोन्हीही दुचाकींची देवाळे गावानजीक समोरासमोर धडक झाली.

या अपघातात तिघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी सुरेश कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उदय कुलकर्णी यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
 

 

Web Title: Two-wheeler face-to-face collision, three accidentally injured: two elderly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.