प्रशासकीय इमारत परिसरातून दोन दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:41 IST2021-03-13T04:41:53+5:302021-03-13T04:41:53+5:30

कोल्हापूर : कसबा बावड्यातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या दोन दुचाकी ४ ते ९ मार्च २०२१ या दरम्यान ...

Two two-wheeler lamps from the administrative building premises | प्रशासकीय इमारत परिसरातून दोन दुचाकी लंपास

प्रशासकीय इमारत परिसरातून दोन दुचाकी लंपास

कोल्हापूर : कसबा बावड्यातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या दोन दुचाकी ४ ते ९ मार्च २०२१ या दरम्यान चोरट्यांनी लांबविल्या. याबाबतची फिर्याद झाकीर इब्राहीम मुजावर (४६, दर्गा रोड, पन्हाळा) व अक्षय परशुराम चव्हाण (२५, रा. संत रोहिदास काॅलनी , सुभाषनगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

पहिल्या चोरीच्या घटनेत फिर्यादी मुजावर हे कामानिमित्त मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये गुरुवारी (दि.४) रोजी आले होते. त्यांनी आपली दुचाकी उपसंचालक आरोग्य विभागासमोरील पार्किंगमध्ये उभी केली होती. काम संपल्यानंतर ते दुचाकी नेण्यासाठी आले असता त्यांनी ती मिळून आली नाही. दुसऱ्या घटनेत मंगळवारी (दि.९) चव्हाण यांनी आपली दुचाकी प्रशासकीय इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. त्यांनाही याचप्रमाणे दुचाकी नसल्याचे दिसून आले. या दोघांंनी शाहूपुरी पोलिसांत दुचाकी चोरीची फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंद झाला.

Web Title: Two two-wheeler lamps from the administrative building premises