दोन्ही आघाड्यांकडून दोन हजार मतदार अज्ञातस्थळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:23 IST2021-05-01T04:23:36+5:302021-05-01T04:23:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’चे मतदान दोन दिवसावर आल्याने दोन्ही आघाड्यांच्या अंतर्गत हालचाली वेगावल्या आहेत. ठरावधारकांच्या मनधरणीबरोबरच हा ...

दोन्ही आघाड्यांकडून दोन हजार मतदार अज्ञातस्थळी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’चे मतदान दोन दिवसावर आल्याने दोन्ही आघाड्यांच्या अंतर्गत हालचाली वेगावल्या आहेत. ठरावधारकांच्या मनधरणीबरोबरच हा गट फुटला... त्याने पाठिंबा दिला... अशा सोशल मीडियावरील अफवांचे शुक्रवारी पेवच फुटल्याने दोन्ही आघाड्यांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.
‘गोकुळ’च्या निवडणुकीच्या प्रचार तोफा शुक्रवारी थंडावल्या असल्या तरी, रात्रीपासून गुप्त हालचाली गतिमान झाल्या आहेत. शेवटच्या टप्प्यात अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक तालुकानिहाय अंदाज घेऊन फोडाफोडी सुरू केल्या आहेत. त्यातून दिवसभर अफवांचे पेव फुटले होते. करवीरमधील विरोधी आघाडीचे ५४ ठरावधारक सत्तारूढ गटासोबत... हे जोरदार व्हायरल झाले होते. मात्र ही अफवाच ठरली. यासह शुक्रवारी दिवसभर सोशल मीडियावर अफवांचा नुसता पाऊस पडत होता.
दरम्यान, दोन्ही आघाड्यांकडून दोन हजार मतदारांना अज्ञातस्थळी हलविले आहे. त्यांना उद्या, रविवारी सकाळीच थेट मतदान केंद्रावर आणले जाणार आहे.
एका एका मतासाठी जोरदार प्रयत्न
‘गोकुळ’साठी शेवटच्या टप्प्यात एका एका मतासाठी उमेदवारांनी जोरदार प्रयत्न केले. मतदानाच्या अगोदर दोन दिवस एक मत लाखमोलाचे झाले होते.
खुलासा करताना दमछाक
विरोधी आघाडीचे पन्नास ठरावधारक फुटले... सत्तारूढ गटाचे शंभरजण संपर्कात... आदी अफवा पसरल्या होत्या. त्याचा खुलासा सोशल मीडियावरून करताना दोन्ही आघाड्यांची दमछाक उडाली होती.