कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील किसरूळ आणि उत्रे येथे गव्यांनी केलेल्या हल्ल्यात दोघे जखमी झाले. या घटना शनिवारी (दि. ३) सकाळी सहाच्या सुमारास घडल्या. तुकाराम महादेव पाटील (वय ७३, रा. किसरूळ) आणि सर्जेराव सखाराम कांबळे (५१, रा. उत्रे) अशी जखमींची नावे आहेत. दोन्ही जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.किसरूळ येथील तुकाराम पाटील हे शुक्रवारी (दि. २) रात्री मुलासोबत राखणीसाठी शेतात गेले होते. सकाळी सहाच्या सुमरास दोघे गावाकडे निघाले. त्याचवेळी गव्यांचा कळप आला. तुकाराम पाटील यांच्याकडील बॅटरीच्या प्रकाशामुळे एका गव्याने त्यांच्यावर चाल केली. उचलून बाजूला फेकल्याने गव्याचे शिंग त्यांच्या मानेला लागले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. उत्रे येथील सर्जेराव कांबळे कोल्हापुरातील राजर्षी शाहू मार्केट यार्डमध्ये हमालीचे काम करतात. रात्रपाळीचे काम संपवून मित्रासोबत कारमधून ते गावाकडे निघाले होते. सकाळी सहाच्या सुमारास उत्रे येथील वन विभागाच्या कार्यालयाजवळ कार थांबवून ते उतरत असतानाच एका गव्याने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. या धडकेत कांबळे जखमी झाले. कारचेही मोठे नुकसान झाले. जखमी कांबळे यांना नातेवाइकांनी सीपीआरमध्ये दाखल केले. या दोन्ही घटनांची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.गव्यांचे हल्ले वाढलेगेल्या आठवडाभरात शाहूवाडी, पन्हाळा आणि राधानगरी तालुक्यांमध्ये गव्यांचे हल्ले वाढले आहेत. वन विभागाकडून घटनांचे पंचनामे करून जखमींना मदत देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मानवी वस्तीत येणा-या गव्यांची संख्या वाढल्याने स्थानिकांसह वन विभागासमोर हल्ले रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. उसाचा गळीत हंगाम सुरू झाल्याने शिवारात वाढलेल्या माणसांच्या वर्दळीमुळे गवे बुजून हल्ले करीत असल्याचे वन अधिका-यांनी सांगितले.
Web Summary : Two individuals were severely injured in bison attacks in Kisrul and Utre, Panhala. Tukaram Patil and Sarjerao Kamble are hospitalized after separate incidents involving bison encounters near fields and roads. Increased bison activity poses challenges for residents and forest department.
Web Summary : पन्हाला के किसरुल और उत्रे में बाइसन के हमलों में दो लोग गंभीर रूप से घायल हो गए। तुकाराम पाटिल और सर्जेराव कांबले खेतों और सड़कों के पास बाइसन से मुठभेड़ के बाद अस्पताल में भर्ती हैं। बाइसन की बढ़ती गतिविधि निवासियों और वन विभाग के लिए चुनौतियां पेश करती है।