दोन रिक्षाचालकांत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:10 IST2021-02-05T07:10:10+5:302021-02-05T07:10:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : किरकोळ कारणांवरून दोघा रिक्षाचालकांत रविवार पेठेतील आझाद चौक परिसरात हाणामारी झाली. रविवारी दुपारी भररस्त्यावर हा ...

दोन रिक्षाचालकांत हाणामारी
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : किरकोळ कारणांवरून दोघा रिक्षाचालकांत रविवार पेठेतील आझाद चौक परिसरात हाणामारी झाली. रविवारी दुपारी भररस्त्यावर हा प्रकार घडला. सुभाष परशराम माने (रा.विक्रमनगर) याच्या मारहाणीत संजय ईश्वरा सावंत (वय ४५ रा. उजळाईवाडी) हे जखमी झाले. त्यांच्या कानाजवळ जखम झाली. सावंत यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याची नोंद सीपीआर चौकीत झाली आहे.
जखमी महिलेचा मृत्यू
कोल्हापूर : हळदी ते राशिवडे मार्गावर भाच्याच्या दुचाकीवर पाठीमागे बसून प्रवास करताना तोल जाऊन पडल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा रविवारी सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मनिषा बाबू निकम (वय ३५ रा. बहिरेबांबर, ता. राधानगरी) असे त्यांचे नाव आहे. शनिवारी सकाळी हा अपघात झाला होता. सीपीआर पोलीस चौकीत याची नोंद झाली आहे.