शहरं
Join us  
Trending Stories
1
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
2
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
3
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
5
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
6
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
7
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
8
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
10
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
13
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
14
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
15
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
16
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
17
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
18
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
19
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
20
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

प्रो-लीगमध्ये खेळणार कासेगावचे दोन खेळाडू

By admin | Updated: July 18, 2015 00:21 IST

कबड्डी : काशिलिंग करणार पुन्हा ‘दबंगगिरी’, तर रवींद्र ‘पलटन’चा सैनिक

कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील काशिलिंग आडके व रवींद्र कुमावत हे दोन कबड्डीपटू यावर्षी प्रो लीग कबड्डी स्पर्धेत खेळणार आहेत. काशिलिंग आडके हा ‘दिल्ली दबंग’कडून, तर रवींद्र कुमावत हा ‘पुणेरी पलटन’कडून खेळणार आहे. कुमावतच्या निवडीने कासेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.कासेगावला कबड्डीची पंढरी म्हणून ओळखले जाते. आजअखेर या खेळाच्या माध्यमातून शेकडोजण विविध ठिकाणी शासकीय सेवेत नोकरीस लागले आहेत. ‘हनुमान उडी’साठी प्रसिद्ध असलेला काशिलिंग आडके याला मागील वर्षी १0 लाखांची बोली लावत दिल्ली दबंग संघाने खरेदी केले आहे, तर यावर्षी रवींद्र कुमावत यालाही पुणेरी पलटण या संघाने खरेदी करून करारबद्ध केले आहे. रवींद्र व काशिलिंग हे दोघेही गावातील क्रांतिसिंह नाना पाटील मंडळाचे खेळाडू आहेत. रवींद्र हा १४, १७ व १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघातून खेळला आहे. सध्या तो कुमार गटात महाराष्ट्र संघात आहे. छत्तीसगढ येथे झालेल्या खुल्या गट स्पर्धेतही तो महाराष्ट्र संघात होता. या संघाचे कर्णधारपद काशिलिंग आडके याने पटकावले होते. सध्या दोघेही खेळाडू आपापल्या संघासोबत प्रो लीगमध्ये खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे समस्त कासेगावकरांचे लक्ष या दोघांच्या खेळावर राहणार आहे. दोन्ही खेळाडूंना क्रांतिसिंह व्यायाम मंडळाचे प्रा. संजय पाटील, ज्ञानदेव पाटील, सुनील पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे. (वार्ताहर)रवींद्र कुमावत हा सध्या कनिष्ठ गटात महाराष्ट्रातील एक नंबरचा खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे. प्रतिस्पर्ध्यांवर चढाई करीत हाताने व पायाने गुण मिळविण्यात तो पटाईत आहे.