कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील दोघा चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ४३ तोळे सोन्याच्या दागिन्यासह ५३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रल्हाद विठ्ठल कवठेकर (रा. तारदाळ, हातकणंगले) आणि उदय माने गजाआड (रा. यड्राव) अशी अटक केलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत.जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून चोरीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. चोरटे भरदिवसाही बंद घरे, बंगले फोडू लागले आहेत. चोरीच्या घटना वाढल्याने चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. अशातच आज, पोलिसांनी तब्बल ५३ लाखांचा मुद्देमाल जप्त करत रेकॉर्डवरील दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटक केलेल्या प्रल्हाद कवठेकर आणि उदय माने या चोरट्याकडून निमशिरगाव रोड तारदाळ इथल्या १ डिसेंबरच्या घरफोडीसह आठ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर, हातकणंगले आणि कुरुंदवाड सह सांगली ग्रामीणमधील गुन्हे देखील उघडकीस आले. अधिक तपासानंतर आणखी गुन्हे समोर येण्याची शक्यता आहे.
Web Summary : Kolhapur police arrested two burglars with prior records, recovering ₹5.3 million worth of stolen goods, including 43 tolas of gold jewelry. The arrests solved eight cases across Kolhapur and Sangli districts, with further investigations ongoing.
Web Summary : कोल्हापुर पुलिस ने दो सेंधमारों को गिरफ्तार किया, जिनका पिछला रिकॉर्ड है। उनके पास से 43 तोला सोने के गहनों सहित ₹53 लाख का चोरी का माल बरामद हुआ। गिरफ्तारियों से कोल्हापुर और सांगली जिलों में आठ मामले सुलझे, आगे की जांच जारी है।