शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ना विमान, ना रेल्वे, दोन दोस्तांचा 'कोल्हापूर टू लंडन' प्रवास थेट कारमधून..

By संदीप आडनाईक | Updated: April 16, 2024 13:26 IST

७० दिवसांच्या १७,००० किलोमीटरच्या या भ्रमंतीदरम्यान, ते २० देशांतील प्रेक्षणीय स्थळांना भेट देणार

संदीप आडनाईककोल्हापूर : जगात भारी, आपले कोल्हापुरी. कोल्हापुरकर काय करतील याचा नेम नाही. दुसऱ्या देशात जाण्यासाठी लोक सहसा विमान, जहाज किंवा रेल्वेमार्ग पसंत करतात, मात्र कोल्हापुरातील दोन दोस्तांनी आपल्या फार्च्युनर कारने कोल्हापूर ते लंडनपर्यंतच्या २० देशांच्या प्रवासाला सोमवारपासून सुरुवात केली आहे, असं सांगितलं तर कदाचित विश्वास बसणार नाही. थेट कोल्हापुरातून कारने प्रवास करणारे ते पहिलेच आहेत.वसुधैव कुटुंबकम म्हणजे विश्व हे एक कुटुंब आहे, याचा अनुभव घेत वैयक्तिक सहल करण्याची मदन राजाराम भंडारी आणि प्रसाद उर्फ बापू कृष्णात कोंडेकर या दोन मित्रांची इच्छा होती. त्याला कोल्हापुरातील गो हॉलिडेज ३६५ चे अमित चौकले यांनी मूर्त रुप दिले. ७० दिवसांच्या १७,००० किलोमीटरच्या या भ्रमंतीदरम्यान, ते २० देशांतील प्रेक्षणीय स्थळांना भेट देणार आहेत. साने गुरुजीतील भंडारी हे पन्नाशीचे तर राजारामपुरीतील कोंडेकर हे ५८ वर्षांचे आहेत. दोघेही उद्योजक आहेत. यापूर्वीही त्यांनी २० देशांमध्ये पर्यटन केले आहे. परंतु कोल्हापुरातून कारने थेट लंडन गाठण्याची त्यांची इच्छा होती ती या निमित्ताने ते पूर्ण करत आहेत. कोल्हापुरकरांना अभिमान वाटावा असा त्यांचा प्रवास असणार आहे.सर्व परवानग्या अन् २० देशांचा व्हिसाया प्रवासासाठी दाेन महिन्यांपासून ते तयारी करत आहेत. त्यात २० देशांच्या परवानग्या, गाडीच्या परवानग्या आणि व्हिसा या गोष्टींचा समावेश आहे. यानंतर या प्रवासाची तारीख त्यांनी पक्की केली. यादरम्यान त्यांच्या राहण्याची, परदेशी चलनाची, ट्रॅव्हल्स आणि मेडिकल इन्शुरन्सची व्यवस्था कोल्हापुरातील गो हॉलिडेज ३६५ चे अमित चौकले यांनी केली.

कसा असेल प्रवास?नेपाळ, चीन, किरगिझस्तान, उझबेकिस्तान, कझाकीस्तान, रशिया, जॉर्जिया, टर्की, बल्गेरिया, सर्बिया, हंगेरी, झेक रिपब्लिकन, बेल्जियम, युके अशा २० देशांतून त्यांचा प्रवास असेल. यापूर्वी अनेकांनी कारप्रवासासाठी उत्तर प्रदेशातील गोरखपूरची निवड केली. परतीच्या प्रवासात मात्र हे दोन मित्र विमानाने कोल्हापूरला येतील.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर