शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
5
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
6
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
7
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
8
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
9
'क्रिस्टल ब्लॅक पर्ल' रंगात होंडा अमेझ भारतात लॉन्च; नव्या लूकमध्ये दिसते आणखी धासू!
10
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
11
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
12
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
13
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
14
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
15
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
16
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
17
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
18
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
19
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
20
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स

Kolhapur: हातकणंगलेत लाच स्वीकारताना पुरवठा विभागाचे दोघे जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 11:43 IST

तक्रारदार याचे नाव प्राधान्य कुटुंब योजनेत वरिष्ठांना सांगून समाविष्ट केले असल्याचे सांगत मागितली लाच

हातकणंगले : येथील तालुका पुरवठा विभागाकडे काम करणारा खासगी संगणक ऑपरेटर सुभाष मधुकर घुणके ( वय ३४, रा. घुणके मळा,यळगुड )आणि त्याचा सहकारी शैलेंद्र महादेव डोईफोडे ( वय २२, रा. सनगर गल्ली, पेठवडगाव ) या दोघांना २५०० रुपयांची लाच घेताना शुक्रवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या दोघांविरुद्ध रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.याबाबत मिळालेली माहिती अशी की तक्रारदार याचे नाव शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब योजनेत वरिष्ठांना सांगून समाविष्ट केले आहे. त्यासाठी सुभाष घुणके याने तक्रारदार यांच्याकडे चार हजार रुपयांची मागणी केली होती. यात तडजोड होणार नसल्याचे सांगून त्यांच्याकडून २५०० रुपयांची लाच शुक्रवारी दुपारी तहसील कार्यालयाच्या आवारात पंचासमक्ष घेत असताना लाचलुचपत विभागाने लावलेल्या सापळ्यात अडकला. लाचलुचपतच्या पथकाने सुभाष घुणके व त्याचा सहकारी शैलेंद्र डोईफोडे या दोघांना २५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या दोघा आरोपींविरोधात हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, प्रकाश भंडारे, विकास माने, संदीप काशीद, सचिन पाटील, उदय पाटील, प्रशांत दावने यांच्या पथकाने केली.कर्मचारी गेले कुठेशासनाने कोणत्याही कार्यालयामध्ये उमेदवार अथवा खासगी कर्मचारी नियुक्त करायचे नाहीत, असे स्पष्ट आदेश दिलेले असताना हातकणंगले तहसीलमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाजूला खासगी कर्मचाऱ्याचे टेबल असल्याने कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या अधिकारात त्यांचे काम सोपे होण्यासाठी असे कर्मचारी बसवले आहेत का ? अशी शंका पक्षकारांना आहे.वरिष्ठांची डोळेझाकमहसूल विभागाकडील पुरवठा विभाग सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, गैरव्यवहार, एजंट आणि अन्नधान्याचा विषय नेहमी वादग्रस्त ठरत आहे. एजंट, खासगी इसम रेशन कार्डधारकाची लूट करत असल्याची तक्रार असूनही वरिष्ठ याकडे डोळेझाक करत असतात. त्यामुळे या विभागात चिरीमिरीचे प्रकार वाढले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग