कारागृहात मोबाईल वापरप्रकरणी आणखी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:46 IST2021-03-13T04:46:53+5:302021-03-13T04:46:53+5:30
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील वादग्रस्त मोबाइलप्रकरणी पोलिसांनी मोक्कातील आणखी दोघांना गुरुवारी अटक केली. मयूर राजेंद्र जाधव (रा. कोडोली, ...

कारागृहात मोबाईल वापरप्रकरणी आणखी दोघांना अटक
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील वादग्रस्त मोबाइलप्रकरणी पोलिसांनी मोक्कातील आणखी दोघांना गुरुवारी अटक केली. मयूर राजेंद्र जाधव (रा. कोडोली, जि.सातारा) व विकी उर्फ मन्या नंदकुमार बनसोडे (रा. नरवणे,ता. माण, जि.सातारा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
कळंबा कारागृहातील अंडा बराकीमध्ये मोक्काअंर्तर्गत कारवाई केलेल्या बंदिजनाना ठेवण्यात आले होते. तेथे या दोघांसह युवराज महाडिक, शुक्रराज घाडगे, अभिमान माने हेही या प्रकरणी यापूर्वी अटक करण्यात आलेले पाचजणांना ठेवण्यात आले होते. या सर्वांनीच मोबाइलचा वापर केल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे या पाचही जणांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी केली.
फोटो : १३०३२०२१-कोल-मयूर जाधव (आरोपी)
फोटो : १३०२२०२१-कोल-विकी उर्फ मन्या बनसोडे (आरोपी)