शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

गावठी पिस्तुलासह दोघांना अटक, २७ जिवंत काडतुसे जप्त : सापळा रचून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 3:30 PM

कोल्हापूर : हेरवाड (ता. शिरोळ) येथे कुरुंदवाड ते पाच मैल चौक जाणाऱ्या रोडवर हेरवाड बसस्टॉपसमोर सापळा रचून दोघा संशयितांकडून एक ...

ठळक मुद्देगावठी पिस्तुलासह दोघांना अटक२७ जिवंत काडतुसे जप्त : सापळा रचून कारवाई

कोल्हापूर : हेरवाड (ता. शिरोळ) येथे कुरुंदवाड ते पाच मैल चौक जाणाऱ्या रोडवर हेरवाड बसस्टॉपसमोर सापळा रचून दोघा संशयितांकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, २७ काडतुसे पोलिसांनी जप्त केले. विजय गणपती कुडचे (वय ३५), प्रदीप लहू धाबडे (२६ दोघेही रा. इंगळी, ता. चिक्कोडी) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ५२ हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.विधानसभा निवडणूक शांतता आणि भयमुक्त वातावरण पार पडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्या संशयितांची माहिती गोळा करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते.

पोलिस हवालदार श्रीकांत मोहिते यांना हेरवाड (ता. शिरोळ) परिसरात दोघे जण गावठी पिस्तूलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. कुरुंदवाड ते पाच मैल चौकाकडे जाणाऱ्या रोडवर हेरवाड बसस्टॉप येथे संशयित विजय कुडचे आणि प्रदीप धाबडे थांबले असता त्यांना अटक केली. त्याच्या ताब्यातून १ गावठी बनावटीचे पिस्तूल, २७ काडतुसे असा सुमारे ५२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

त्यांच्यावर कुरुंदवाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी पिस्तुल आनले कोठून, ते कोणाला विक्री करणार होते, याची चौकशी सुरु आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार, विजय कारंडे, सचिन गुरखे, उत्तम सडोलीकर, किरण गावडे, श्रीकांत पाटील, वैभव पाटील, संजय पडवळ, प्रदीप पवार, नेताजी डोंगरे, सचिन पाटील, नामदेव यादव, रणजित कांबळे, विलास किरोळकर, अनिल पास्ते आदींचा सहभाग होता.नागरिकांना आवाहनआचारसंहितेच्या अनुषंगाने परिसरात बेकायदेशीर शस्त्रे बाळगून दहशत माजविणे, गुन्हेगारी टोळीची माहिती मिळाल्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे संपर्क साधावा. नागरिकांनी ०२३१-२६६५६१७ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर