वडणगेत दोन लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:10 IST2021-02-05T07:10:32+5:302021-02-05T07:10:32+5:30
कोल्हापूर : बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्याने सुमारे दोन लाखाची घरफोडी केली. ही घटना करवीर तालुक्यातील वडणगे येथे ...

वडणगेत दोन लाखांची घरफोडी
कोल्हापूर : बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्याने सुमारे दोन लाखाची घरफोडी केली. ही घटना करवीर तालुक्यातील वडणगे येथे घडली. याबाबत शहाजी कृष्णात पाटील (रा. शंकरआण्णा नगर, वडणगे, ता. करवीर) यांनी घरफोडीची तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहाजी पाटील हे रविवारी (दि. २४) सायंकाळी सहकुटुंब सागाव येथे मामाच्या गावी गेले होते. त्याच रात्री अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून व कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्याने घरातील सुमारे ४० हजाराची रोकड, १३ ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ, १४ ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस, ३ ग्रॅमची सोन्याची पिळ्याची अंगठी असा सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केला. याबाबत शहाजी पाटील यांनी करवीर पोलीस ठाण्यात घरफोडीची तक्रार दिली आहे.