लक्षतीर्थ वसाहतीमध्ये मारहाणीत दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:56 IST2020-12-05T04:56:18+5:302020-12-05T04:56:18+5:30

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महमंद महात व हेमंत तांबेकर हे दोघे परिसरातील किराणा दुकानाच्या दारात उभे होते. दरम्यान ...

Two injured in beating at Lakshatirtha colony | लक्षतीर्थ वसाहतीमध्ये मारहाणीत दोघे जखमी

लक्षतीर्थ वसाहतीमध्ये मारहाणीत दोघे जखमी

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महमंद महात व हेमंत तांबेकर हे दोघे परिसरातील किराणा दुकानाच्या दारात उभे होते. दरम्यान तेथे त्यांचा एक मित्र तेथे आला, त्याने आपल्या दुचाकीवर महात व तांबेकर यांना बसवले. पुढे त्यांना आयडियल कॉलनी परिसरात संशयित सागर भाटे व राजू नदाफ या दोघांनी अडविले. त्यावेळी त्यांनी त्यांना नदाफ यांचे मांजर कुठे आहे? याची विचारणा केली. पण ते माहीत नसल्याचे महात यांनी सांगितले. याच कारणातून सागर व राजू या दोघांनी त्यांना काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोघेही जखमी झाले. याबाबत तक्रारीवरून करवीर पोलीस ठाण्यात सागर व राजूवर गुन्हा दाखल करण्यात आला.

(तानाजी)

Web Title: Two injured in beating at Lakshatirtha colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.