शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

Kolhapur: चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी भिंतीला धडकली, अपघातात जवानासह दोघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 19:14 IST

कसबा सांगाव : चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी भिंतीला धडकून भारतीय सैन्य दलातील जवानासह दोघांचा मृत्यू झाला. जवान प्रकाश यशवंत सूर्यवंशी ...

कसबा सांगाव : चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी भिंतीला धडकून भारतीय सैन्य दलातील जवानासह दोघांचा मृत्यू झाला. जवान प्रकाश यशवंत सूर्यवंशी (वय २५), ओंकार विलास जठार (२२, दोघे रा. मांगुर, ता. निपाणी, जि. बेळगाव) अशी मृतांची नावे आहेत. पंचतारांकित औद्योगिक वसाहत कागल- हातकणंगले येथे राञी उशीरा हा अपघात झाला.याबाबत घटनास्थळावरुन व पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, काल सोमवारी राञी प्रकाश व ओंकार हे दोघे ही कोल्हापूरला जावून येतो असे सांगून घरातून दुचाकीने (क्र.के.ए.२३ ईएफ.१९५७) निघाले होते. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमार्गे येत असताना त्यांच्या दुचाकीची भिंतीला धडक झाली. यात दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले.ओंकार हा खासगी कंपनीत मालवाहतूक करणा-या टेम्पोवर चालक म्हणून काम करीत होता. तर प्रकाश हा सैन्यात बेंगलोर येथे कार्यरत होता. प्रकाश हा पत्नीची डिलिव्हरी होणार म्हणून सुट्टी वर आला होता. त्याला सव्वा महिन्यांचा मुलगा आहे. तो २८ डिसेंबरला पुन्हा कामावर बेगंलोर येथे रूजू होणार होता.प्रकाश हा दोन तीन वर्षापूर्वी सैन्यात रूजू झाला होता. त्या ठिकाणी चार वर्षे सेवा सेवा बजावल्यानंतर त्याची पॅरा कमांडो म्हणून जम्मू काश्मीर येथे नुकतीच नियुक्ती झाल्याची माहिती मिळाली. त्याच्या पश्चात आई, एक मोठा भाऊ, पत्नी व सव्वा महिन्यांचा मुलगा तर ओंकार याच्या पश्चात आई, वडील व एक लहान भाऊ असे कुटुंब आहे. अपघातीमृत्यूने गावात सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे. या बाबतची फिर्याद मयत प्रकाश याचा भाऊ संदीप यशवंत सुर्यवंशी याने गोकुळ शिरगाव पोलिसात दिली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर हे करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू