शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील जवाहरनगरात भररस्त्यात दोन गट भिडले, सराईत गुंड अमोल भास्करसह चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 15:45 IST

तलवार, चाकू, हॉकी स्टीकचा वापर 

कोल्हापूर : त्र्यंबोली देवीच्या यात्रेसाठी गुलाल उडविण्याचे मशीन (पेपर ब्लस्टर) दिले नसल्याच्या कारणातून जवाहरनगरातील बिजली चौकात दोन गटांत तुफान हाणामारी झाली. काही जणांनी विरोधी गटातील तरुणांच्या घरात जाऊन तलवारीचा धाक दाखवत दहशत माजवली. हा प्रकार मंगळवारी (दि. १५) दुपारी घडला. याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून, सराईत गुंड अमोल महादेव भास्करसह दोन्ही गटांतील १० जणांवर गुन्हा दाखल झाला. भास्कर याच्यासह चौघांना पोलिसांनी अटक केली.यात्रेसाठी गुलाल उडविण्याचे मशीन दिले नसल्याच्या रागातून प्रथमेश हरी सोनवणे (वय २५) याला चौघांनी काठी, हॉकी स्टीक आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी दुपारी दोनच्या सुमरास बिजली चौकात घडला. त्याच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी विजय सुरेश कदम (२५), सागर दिनकर सोनवणे (३४), अजय सुरेश कदम (२३) आणि सुरेश शंकर कदम (४६, सर्व रा. जवाहरनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला. मारहाणीनंतर सुरेश कदम याने फिर्यादी प्रथमेश याच्या घरी जाऊन त्याच्या आईला तलवारीचा धाक दाखवत दहशत माजवली.यानंतर काही वेळातच श्री लॉनसमोर अंगावर पाणी टाकल्याचे निमित्त करून सागर दिनकर सोनवणे (३४) आणि त्यांचा भाचा विजय कदम यांना अमोल भास्कर याच्यासह सहा जणांनी हॉकी स्टीकने मारहाण केली. सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अमोल भास्कर, पिंटू भास्कर, ओम भास्कर, प्रथमेश सोनवणे, रोहित चव्हाण आणि प्रतीक थोरात (सर्व रा. जवाहरनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला. भरदिवसा दोन गटांत झालेल्या मारामारीमुळे जवाहरनगर परिसरात दहशत निर्माण झाली होती. मारामारीचे व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाले आहेत.

चौघांना अटकसराईत गुंड अमोल भास्कर याच्यासह पिंटू भास्कर आणि प्रथमेश सोनवणे यांना पोलिसांनी अटक केली. दुसऱ्या गटातील विजय कदम याला अटक झाली. न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. जवाहरनगर परिसरात अजूनही टोळीयुद्ध सुरू असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाल्याने कायदा सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.