चोकाक येथे दोन गटात हाणामारी,दोन्ही गटाकडून परस्परविरोधी तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 01:26 IST2018-04-04T01:26:38+5:302018-04-04T01:26:38+5:30

हातकणंगले : चोकाक येथे एकमेकाकडे बघण्याच्या कारणावरून युवकाच्या दोन गटामध्ये हाणामारी झाली.

Two groups clash in Chokak, conflicting complaints from both groups | चोकाक येथे दोन गटात हाणामारी,दोन्ही गटाकडून परस्परविरोधी तक्रारी

चोकाक येथे दोन गटात हाणामारी,दोन्ही गटाकडून परस्परविरोधी तक्रारी

हातकणंगले : चोकाक येथे एकमेकाकडे बघण्याच्या कारणावरून युवकाच्या दोन गटामध्ये हाणामारी झाली. यावेळी झालेल्या दगडफेकीमध्ये पाच युवक किरकोळ जखमी झाले आहेत. यानंतर युवकानी तलवारी, कोयते आणि धारधार शस्त्रे घेवून एकमेकांचा पाठलाग करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस वेळीच दाखल झाल्यानो पुढील अनर्थ ठळला. दोन्ही गटाकडून परस्परविरोधी तक्रारी हातकणंगले पोलिस ठाण्यात दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
गावातील काही युवक शिवाजी चौकात रात्री नऊच्या दरम्यान बसले होते. यावेळी गिरीष मारूती कांबळे हा युवक कामावरून घरी जात होता. शिवाजी चौकात तुषार लोहार, अजिंक्य भोपळे, आणि प्रशांत पाटील यांच्याकडे गिरीष यांने बघितल्याच्या कारणावरुन वाद झाला . ही माहिती इतर तरुणाना समजताच दोन्हीकडील समर्थक एकत्र जमा झाले व मारामारी झाली. यावेळी झालेल्या दगडफेकीमध्ये पाच युवक किरकोळ जखमी झाले. या प्रकारानंतर कांही युवकानी हातात तलवारी, कोयते आणि धारधार शस्त्रे घेवून गावामध्ये दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Two groups clash in Chokak, conflicting complaints from both groups