शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

राधानगरीचे दोन दरवाजे सुरूच, पावसाची मात्र उघडझाप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 17:57 IST

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पावसाची उघडझाप राहिली. गगनबावडा, आजरा, शाहूवाडी तालुक्यांत अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे अद्याप सुरूच आहेत. दूधगंगा व वारणा धरणांतून विसर्ग वाढविण्यात आला आहे. दूधगंगा, वेदगंगेची पातळी थोडी वाढली असून पंचगंगेची पातळी कमी झाली आहे.

ठळक मुद्देराधानगरीचे दोन दरवाजे सुरूच, पावसाची मात्र उघडझाप  दूधगंगा, वारणाचा विसर्ग वाढविला

कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पावसाची उघडझाप राहिली. गगनबावडा, आजरा, शाहूवाडी तालुक्यांत अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे अद्याप सुरूच आहेत. दूधगंगा व वारणा धरणांतून विसर्ग वाढविण्यात आला आहे. दूधगंगा, वेदगंगेची पातळी थोडी वाढली असून पंचगंगेची पातळी कमी झाली आहे.बुधवारी सकाळी हातकणंगले, शिरोळ वगळता पावसाची भुरभुर राहिली. सकाळी दहानंतर मात्र पावसाने काहीशी उसंत घेतली. कोल्हापूर शहर, करवीर तालुक्यात दुपारी काही काळ ऊन पडले होते. दुपारनंतर पावसाची भुरभुर राहिली. एकूणच दिवसभरात पावसाची उघडझाप राहिली.

गगनबावडा, शाहूवाडी, आजरा तालुक्यात मात्र जोरदार सरी कोसळल्या. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस असून पाणी पातळीत वाढ झाली आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून त्यातून प्रतिसेंकद ४२५६ घनफुट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

वारणा धरणातून सकाळी ६०९३ विसर्ग होता त्यात वाढ करून सायंकाळी सात वाजता ७२०६ घनफुट करण्यात आला. दूधगंगा धरणातूनही ४९०० घनफुट विसर्ग सुरू असल्याने दूधगंगा व वेदगंगा नद्यांची पातळी थोडी वाढली आहे. त्यामुळेच बुधवारी सकाळी २४ बंधारे पाण्याखाली होते, त्यात वाढ होऊन २९ पर्यंत पोहचली. पंचगंगेची पातळी ३४ फुट असून पाणी हळूहळू पात्रात सरकू लागले आहे.दरम्यान, बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी २३.५४ मिली मीटर पाऊस झाला. या कालावधीत दहा खासगी मालमत्तांची पडझड होऊन २ लाख ९२ हजार रूपयांचे नुकसान झाले.अतिवृष्टी झालीच नाहीहवामान विभागाने बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी होईल, असा अंदाज वर्तवल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला होता. मात्र प्रत्येक्षात उघडझापच राहिली.अलमट्टीतून ४० हजारचा विसर्गअलमट्टी धरणात प्रतिसेंकद १ लाख ७४ हजार ११५ घनफुट पाणी येते. मात्र धरणातून ४० हजार ९२२ घनफुटचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांची पातळी संथ गतीने कमी होत आहे.धरणातील पाणीसाठा, टीएमसीमध्ये

  • राधानगरी - ८.३२.
  • तुळशी - २.९५
  • वारणा - २९.८८
  • दूधगंगा - २२.४५
  • कासारी - २.२८
  • कडवी - २.३२
  • कुंभी - २.२२
  • पाटगाव - ३.४८.

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर