शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
4
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
5
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
6
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
7
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
8
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
10
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
11
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
12
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
14
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
15
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
16
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
17
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
18
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
19
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
20
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार

पानसरे स्मृतिदिनानिमित्त एकाच वेळेला दोन कार्यक्रम; शनिवारी स्मृतिदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 10:50 AM

Govind Pansare Kolhapur- ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांचा सहावा स्मृतिदिन शनिवारी होत आहे; परंतु एकाच दिवशी व एकाच वेळेला म्हणजे सहा वाजता दोन वेगवेगळ्या संस्थांकडून दोन कार्यक्रमांचे एकाच ठिकाणी आयोजन करण्यात आल्याने पानसरे यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांतील दुहीचे प्रदर्शन होत आहे. पानसरे यांच्यावर वैचारिक श्रद्धा असणारा व दोन्ही व्याख्यात्यांना ऐकायला येणारा वर्ग एकच असतानाही एकाच वेळेला हे कार्यक्रम होत असल्याने लोकांचीही अडचण होणार आहे.

ठळक मुद्देपानसरे स्मृतिदिनानिमित्त एकाच वेळेला दोन कार्यक्रम; शनिवारी स्मृतिदिन रविशकुमार ऑनलाईन, तर कन्हैयाकुमार यांची दसरा चौकात सभा

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांचा सहावा स्मृतिदिन शनिवारी होत आहे; परंतु एकाच दिवशी व एकाच वेळेला म्हणजे सहा वाजता दोन वेगवेगळ्या संस्थांकडून दोन कार्यक्रमांचे एकाच ठिकाणी आयोजन करण्यात आल्याने पानसरे यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांतील दुहीचे प्रदर्शन होत आहे. पानसरे यांच्यावर वैचारिक श्रद्धा असणारा व दोन्ही व्याख्यात्यांना ऐकायला येणारा वर्ग एकच असतानाही एकाच वेळेला हे कार्यक्रम होत असल्याने लोकांचीही अडचण होणार आहे.श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने दिलीप पवार, एस. बी. पाटील, व्यंकाप्पा भोसले, प्रा. उदय नारकर, मेघा पानसरे, रसिया पडळकर यांनी पुढाकार घेऊन एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक रविशकुमार यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे. त्याची घोषणा अगोदरच झाली आहे.

भारतीय लोकशाहीचा भविष्यवेध या विषयावर ते व्याख्यान देतील. ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभा सदस्य कुमार केतकर हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. हा कार्यक्रम ६ ते ८ या वेळेत आहे. शाहू स्मारक भवनमध्ये त्याचे लोकांसाठी थेट प्रक्षेपणही आयोजित केले आहे. रविशकुमार ६ ते ७ अशी एक तास मांडणी करणार आहेत.डाव्या संघटनांचा युवा आक्रमक चेहरा असलेला कन्हैयाकुमार याची त्याचदिवशी सायंकाळी ६.३० वाजताच दसरा चौकात जाहीर सभा होणार असल्याची माहिती गिरीश फोंडे यांनी बुधवारी पोलिसांनी सभेस परवानगी दिल्यावर घाईगडबडीत पत्रकार परिषद घेऊन दिली. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन व ऑल इंडिया यूथ फेडरेशनने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ असतील.

आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजू आवळे, माजी आमदार मालोजीराजे, जेएनयूमधील विद्यार्थी नेत्या अमृता पाठक प्रमुख उपस्थित राहणार आहेत. रविशकुमार यांचे मार्गदर्शन झाल्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता दसरा चौकातील मैदानावर कन्हैयाकुमार याची सभा होणार असल्याचे फोंडे यांनी सांगितले असले तरी तोपर्यंत श्रमिक प्रतिष्ठानचा कार्यक्रम होणार नाही आणि एकाच वेळेला शाहू स्मारकमध्ये व स्मारकाबाहेर असे दोन कार्यक्रम सुरू राहिल्यास ऑनलाईन कार्यक्रमात त्याचा व्यत्यय येऊ शकतो. 

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेkanhaiya kumarकन्हैय्या कुमारRavish Kumarरवीश कुमारkolhapurकोल्हापूर