शहरात दोन दिवस पाणीबाणी, तपोवन मैदान येथील पाईपलाईनला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 05:40 PM2020-07-04T17:40:08+5:302020-07-04T17:42:06+5:30

तपोवन मैदानाशेजारील शिंगणापूर योजनेवरील ११०० मि.मी. व्यासाच्या मुख्य पाईपलाईनला गळती लागली आहे. गळती काढण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे सोमवारी शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच मंगळवारीही तो अपुरा व कमी दाबाने होणार आहे. तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Two days of waterlogging in the city, leaking to the pipeline at Tapovan Maidan | शहरात दोन दिवस पाणीबाणी, तपोवन मैदान येथील पाईपलाईनला गळती

शहरात दोन दिवस पाणीबाणी, तपोवन मैदान येथील पाईपलाईनला गळती

googlenewsNext
ठळक मुद्दे शहरात दोन दिवस पाणीबाणी, तपोवन मैदान येथील पाईपलाईनला गळतीए, बी, ई वॉर्डांमध्ये सोमवार, मंगळवारी पाणीपुरवठा बंद

कोल्हापूर : तपोवन मैदानाशेजारील शिंगणापूर योजनेवरील ११०० मि.मी. व्यासाच्या मुख्य पाईपलाईनला गळती लागली आहे. गळती काढण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे सोमवारी शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच मंगळवारीही तो अपुरा व कमी दाबाने होणार आहे. तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

ए, बी वॉर्डमधील पाणीपुरवठा बंद राहणारा परिसर

आपटेनगर रिंग रोड परिसर, कणेरकरनगर, पुईखडी उंच टाकी परिसर, जीवबा नाना जाधव पार्क, नाना पाटीलनगर, राजोपाध्येनगर, बापूरामनगर, महाराष्ट्रनगर, सुर्वेनगर, साळोखेनगर टाकी, निकम पार्क, संभाजीनगर, कळंबा फिल्टर परिसर, तपोवन, एल आय सी कॉलनी, हनुमाननगर, रेसकोर्स नाका परिसर, गंजीमाळ, शिवाजी पेठ, मंगळवार पेठेचा काही भाग, इ., हॉकी स्टेडियम, सुभाषनगर संप व पंपवरून वितरित होणारा भाग, जवाहरनगर, नेहरूनगर, वाय. पी. पोवारनगर, आर. के.नगर, बळवंतनगर, इत्यादी व शिंगणापूर योजनेवरून वितरित होणारा भाग.

ई वॉर्डमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार परिसर

संपूर्ण राजारामपुरी, मातंग वसाहत, बागल चौक, शिवाजी उद्यमनगर, शास्त्रीनगर, सागरमाळ, राजेंद्रनगर, वैभव सोसायटी, दौलतनगर, शाहूनगर, जामसांडेकर माळ, महाडिक माळ, माळी कॉलनी, टाकाळा परिसर, वड्डवाडी, सम्राटनगर, शिवाजी विद्यापीठ, इंगळेनगर, काटकर माळ, रुईकर कॉलनी, मार्केट यार्ड, लोणार वसाहत, शिवाजी पार्क, शाहूपुरी परिसर, शिवाजी पार्क, रुईकर कॉलनी, लिशा हॉटेल परिसर.

Web Title: Two days of waterlogging in the city, leaking to the pipeline at Tapovan Maidan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.