पूर्ववैमनस्यातून एकावर कोयत्याने वार दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:13 IST2021-03-30T04:13:26+5:302021-03-30T04:13:26+5:30
इचलकरंजी : नदीवेस नाका मरगूबाई मंदिर परिसरात पूर्ववैमनस्यातून तिघांनी कोयत्याने वार करून एकास जखमी केले. धनंजय महादेव नायकवडे (रा. ...

पूर्ववैमनस्यातून एकावर कोयत्याने वार दोघांना अटक
इचलकरंजी : नदीवेस नाका मरगूबाई मंदिर परिसरात पूर्ववैमनस्यातून तिघांनी कोयत्याने वार करून एकास जखमी केले. धनंजय महादेव नायकवडे (रा. घोरपडे नाट्यगृहामागे) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी गावभाग पोलिसांनी एका अल्पवयीनसह दोघांना अटक केली. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याबाबतची तक्रार अजिंक्य उत्तम जामदार (वय २८, रा. गावभाग) याने दिली आहे.
अफताब ऊर्फ मोसीन मोमीन व संकेत नाकार्डे अशी पोलीस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, मरगूबाई मंदिरशेजारी शनिवारी (दि.२७) अजिंक्य जामदार, धनंजय नायकवडे व सौरभ ढोले हे तिघेजण त्याठिकाणी गप्पा मारत बसले होते. त्यावेळी वरील संशयित त्याठिकाणी आले व धनंजय यास शिवीगाळ करून धारदार कोयत्याने डोक्यात व पोटावर वार केले. यावेळी धनंजय यास अजिंक्य हा वाचविण्यासाठी गेला असता त्याच्यावरही हल्ला चढविला. त्यामुळे तोही जखमी झाला, असे तक्रारीत म्हटले आहे.