उजळाईवाडीत कोविड रुग्णांसाठी अडीच हजारांची औषधे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:18 IST2021-05-28T04:18:42+5:302021-05-28T04:18:42+5:30

उचगाव : उजळाईवाडीतील कोविड पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांच्या औषध उपचारासाठी प्रत्येकी २५०० रुपयांची औषधे मोफत देण्याचा अभिनव उपक्रम एस.फोर.ए. ...

Two and a half thousand medicines for Kovid patients in Ujlaiwadi | उजळाईवाडीत कोविड रुग्णांसाठी अडीच हजारांची औषधे

उजळाईवाडीत कोविड रुग्णांसाठी अडीच हजारांची औषधे

उचगाव : उजळाईवाडीतील कोविड पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांच्या औषध उपचारासाठी प्रत्येकी २५०० रुपयांची औषधे मोफत देण्याचा अभिनव उपक्रम एस.फोर.ए. ग्रुपने सुरू केल्याची माहिती ग्रुपचे कार्यकर्ते राजू माने यांनी दिली.

कोविड संसर्गजन्य आजारामुळे रुग्णांची घालमेल होत आहे. गरीब, निराधारांना औषध उपचाराचा खर्च परवडण्यासारखा नसतो. ही गरज ओळखून एस.फोर.ए.ग्रुप कोविड रुग्णांच्या मदतीला धावून आला आहे. या ग्रुपच्या वतीने एक लाख २५ हजारांचा निधी संकलित केला आहे. जे रुग्ण हॉस्पिटलमध्ये, घरी किंवा कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत अशा रुग्णांना ही औषधे देण्यात येणार आहेत. या सेवेचा लाभ घेण्यासाठी रुग्णाचे आधार कार्ड, रेशन कार्ड, कोविड तपासणी रिपोर्ट, आवश्यक असून याकरिता ग्रुपच्या स्वयंसेवकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Two and a half thousand medicines for Kovid patients in Ujlaiwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.