रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी जाणारे दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:26 IST2021-07-30T04:26:24+5:302021-07-30T04:26:24+5:30

कोल्हापूर : कोरोना रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या गुरुवारी दुप्पट झाली. नवे ६८३ रूग्ण नोंदविण्यात आले असून, २२ ...

Twice as many go home better than patients | रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी जाणारे दुप्पट

रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी जाणारे दुप्पट

कोल्हापूर : कोरोना रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या गुरुवारी दुप्पट झाली. नवे ६८३ रूग्ण नोंदविण्यात आले असून, २२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ७ हजार ३५९ रूग्णांवर उपचार सुरू असून, ११३६ जणांनी गेल्या २४ तासांत कोरोनावर मात केली आहे.

कोल्हापूर शहरात १८६, करवीर तालुक्यात १०९ तर हातकणंगले तालुक्यात ८९ नवे रूग्ण आढळले आहेत. कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्यात प्रत्येकी पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सुमारे साडेसात हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. दहापर्यंत गेलेला मृतांचा आकडा पुन्हा २२वर गेला आहे.

चौकट

तालुकावार मृत्यू

कोल्हापूर शहर ०५

लक्षतीर्थ वसाहत, संभाजीनगर, उत्तरेश्वर पेठ, टेंबलाई नाका, कसबा बावडा

करवीर ०५

कळंबा, शिंगणापूर, गांधीनगर, पाचगाव ०२

आजरा ०२

आजरा, उत्तूर

हातकणंगले ०२

भादोले २

पन्हाळा ०१

वारणानगर

शाहूवाडी ०१

काटकरवाडी

इचलकरंजी ०१

कागल ०१

बानगे

भुदरगड ०१

पिंपळगाव

शिरोळ ०१

नांदणी

Web Title: Twice as many go home better than patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.