तुळजा भवानी मंदिर परिसर होणार हिरवागार

By Admin | Updated: July 5, 2016 00:10 IST2016-07-04T23:31:01+5:302016-07-05T00:10:45+5:30

राजू दिंडोर्लेंचा उपक्रम : २०० ट्री गार्डचे लोकार्पण; १००० वृक्षलागवडीचा संकल्प

Tulja Bhavani Temple will be situated in the green area | तुळजा भवानी मंदिर परिसर होणार हिरवागार

तुळजा भवानी मंदिर परिसर होणार हिरवागार

कोल्हापूर : पर्यावरण रक्षणाची जबाबदारी फक्त शासनाची नाही, तर नागरिकांचीही आहे. तसेच केवळ वृक्षारोपण नव्हे, तर वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे, या जाणिवेतून मनसेचे शहरप्रमुख व नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी रविवारी तुळजाभवानी मंदिर परिसरात वृक्षारोपण करून २०० ट्री गार्डचे लोकार्पण केले.
ट्री गार्डचे लोकार्पण व वृक्षारोपण खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार अमल महाडिक, पोलिस अधीक्षक प्रदीप
देशपांडे, नगरसेवक राजू दिंडोर्र्ले यांची होती.
राज्य शासनाच्या वृक्ष लागवड उपक्रमाला बळ देण्यासाठी नगरसेवक दिंडोर्ले यांनी तुळजा भवानी मंदिर प्रभागामध्ये १००० वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार त्यांनी वृक्षांसह २०० ट्री गार्डसह खते, कीटकनाशके उपलब्ध करून दिली आहेत. या उपक्रमाला रविवारी मान्यवरांच्या हस्ते सुरुवात झाली.
खासदार महाडिक यांनी या उपक्रमाचे कौतुक करून सर्वस्वी शासनावर अवलंबून राहण्यापेक्षा लोकसहभागातून अनेक प्रश्न सोडविले जाऊ शकतात, असे सांगितले.
आ. महाडिक म्हणाले, या उपक्रमाच्या अनुषंगाने संपूर्ण दक्षिण कोल्हापूर मतदारसंघात हिरवाई फुलविण्याचा मनोदय आहे.
यावेळी जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख, महापालिकेचे मुख्य लेखापाल संजय सरनाईक, उद्यान विभागाचे नितीन पचिंद्रे, गणपती भित्तम, प्रकाश सुतार, सामाजिक वनीकरण विभागाचे भरत पाटील आदींसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Tulja Bhavani Temple will be situated in the green area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.