मुरगूडमधील क्रिकेट स्पर्धेत तुकाराम चौक प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:28 IST2021-01-16T04:28:17+5:302021-01-16T04:28:17+5:30
स्पर्धेत तृतीय क्रमांक राजू आमते स्पोर्टस् मुरगूड व शिवशक्ती स्पोर्टस् शिरगुप्पी यांना विभागून देण्यात आला. वैयक्तिक बक्षिसे अशी : ...

मुरगूडमधील क्रिकेट स्पर्धेत तुकाराम चौक प्रथम
स्पर्धेत तृतीय क्रमांक राजू आमते स्पोर्टस् मुरगूड व शिवशक्ती स्पोर्टस् शिरगुप्पी यांना विभागून देण्यात आला. वैयक्तिक बक्षिसे अशी : उत्कृष्ट फलंदाज- बबलू मांगोरे ( तुकाराम चौक ), उत्कृष्ट गोलंदाज - शफीक (तुकाराम चौक), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक - प्रमोद रामाणे ( सानिका स्पोर्टस् ), मॅन ऑफ दि मॅच - अंतिम सामना -बबलू मांगोरे, मॅन ऑफ द सिरीज - आण्णा वाईंगडे ( मराठा स्पोर्टस् )
एस. पी. स्पोर्ट्स ने स्पर्धेचे आयोजन केले होते. उदघाटन कोरोना योध्द्यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सपोनि विकास बडवे, ‘बिद्री’चे संचालक प्रवीणसिंह पाटील, पोलीस उपनिरीक्षक किशोरकुमार खाडे उपस्थित होते.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ संताजी घोरपडे कारखान्याचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांच्याहस्ते झाले. यावेळी जि. प. सदस्य मनोज फराकटे, दिग्विजय पाटील, सत्यजित पाटील, राजू आमते, जगन्नाथ पुजारी, रणजित सूर्यवंशी, दलितमित्र डी. डी. चौगले, माजी नगराध्यक्ष नामदेव मेंडके, रंगराव पाटील, नामदेवराव भांदिगरे, अमर देवळे, अमर चौगले, सुनील चौगले, संजय मोरबाळे, रणजित मगदूम उपस्थित होते.
फोटो ओळ :-
मुरगूड (ता. कागल) येथील क्रिकेट स्पर्धेत विजेत्या तुकाराम चौक स्पोर्टस् संघास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक वितरित करताना नाविद मुश्रीफ, मनोज फराकटे, दिग्विजय पाटील, सत्यजित पाटील आदी.