शहरं
Join us  
Trending Stories
1
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
2
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
3
डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या
4
छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; अनेक जण जखमी; मोठा शस्त्रसाठा जप्त
5
बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात
6
प्रज्वल देशात परत ये अन् शरण जा; देवेगौडा यांचे पत्र
7
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
8
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
9
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
10
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
11
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
12
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
13
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
14
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
15
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
16
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
17
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
18
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
19
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
20
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत

तुका म्हणे फार । थोडा तरी परउपकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 11:44 PM

इंद्रजित देशमुख वारकरी संप्रदाय हा लोभस आणि प्रेयस या दोन्हींचे संतुलन ठेवून कार्य करत आहे. आजचे आमचे जीवन प्रेयसाने ...

इंद्रजित देशमुखवारकरी संप्रदाय हा लोभस आणि प्रेयस या दोन्हींचे संतुलन ठेवून कार्य करत आहे. आजचे आमचे जीवन प्रेयसाने व्यापले आहे. आजच्या गतिमान युगामध्ये ‘खा, प्या आणि मजा करा’ या सूत्रावरच भर दिला आहे. सध्याचे अनेक अर्थशास्त्रज्ञ आता असे विचारत आहेत की, तुमच्या देशाचे उत्पन्न काय; आहे सांगू नका. तुमच्या देशातील सर्व गरजा भागून तुम्ही सर्व समाधानी आहात काय ? हे विचारत आहेत. आजच्या वैज्ञानिक प्रगतीने मानवाच्या भौतिक जीवनात सर्व बाजूंनी भरपूर संपन्नता आणली आहे. या संपन्नतेमुळे त्याचा कौटुंबीक, सामाजिक जीवनामध्ये अहंकार दुणावला आहे. निसर्गावर मात करून या पुरुषार्थाच्या जोरावर तो सुख मिळवत आहे म्हणजेच प्रेयसाच्या प्राप्तीचा भरपूर आनंद मिळवत आहे. पण, यामध्ये झालेली एकसुरी वाढ, चंगळवाद यामुळे माणसाचे जीवन हे पोकळ झाले आहे. तो आतून संकुचित, अस्थिर आणि अस्वस्थ आहे. आपल्या पुरुषार्थाने बाहेरच्या अनेक गोष्टींवर प्रभूत्व मिळविल्याचे तो मिरवत असला तरीही अंतरंगात तो वासना आणि विकारांचा गुलामच झाला आहे.वारकरी सांप्रदायातील तत्त्वज्ञान या अवस्थेतून बाहेर पडण्याची प्रेरणा देत प्रेयसाला नकार न देता धैर्य, करूणा, प्रेम, ज्ञान, न्याय, सहानुभूती, सदिच्छा, आत्मियता, सत्यम् शिवम् सुंदरम् जीवनाची जीवनमूल्ये रूजविण्याचे कार्य करत आहे. या जीवनमूल्याच्या अधिष्ठानावर मृत्युंजयी अशी जीवननिष्ठा तयार करण्याचे कार्य हा भागवत धर्म करत आहे. विशुद्ध ज्ञान, शांती आणि आनंद या श्रेयसाची प्रतिष्ठापना करण्यासाठीच हा भागवत धर्म सरसावलेला आहे.जरी ऐच्छिक उन्नतीला विरोध नसला तरी स्वत:च्या पाशवी इच्छा आणि वासना यातून व्यक्तिगत जीवन नियंत्रित नाही करता आले तर व्यक्ती, कुटुंब आणि समाज यांच्या जगण्यात अराजक निर्माण होईल, ही भीती विशाल हृदयी संतांना सतत कार्य करण्यासाठी भाग पाडत आहेत. वारकरी सांप्रदायातील चैतन्यभाव हा साऱ्या अनर्थांना टाळण्याचे बळ देतो. जगताचे मूळ अधिष्ठान चैतन्य आहे आणि या चैतन्याला तो प्राधान्य देतो आहे. माऊली या तत्त्वासया उपाधिमाजि गुप्त । चैतन्य असे सर्गंगत । ते तत्त्वज्ञ संत । जाणती ।।जीवन जगण्यासाठी धनाची आवश्यकता मान्य करून धन आणि पदार्थांचा संग्रहही या सांप्रदायास मान्य आहे. परंतु, मिळालेले धन हे उत्तम मार्गाने मिळालेले असावे. धन मिळविण्याचे व्यवहार हे उत्तमच असायला हवेत. कुणाचे शोषण करून, भ्रष्ट मार्गाने धन निषिद्ध मानले आहे. तुकोबाराय म्हणतात,‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करो ।’हे सद्यकालीन वारकरी सांप्रदायाचे औचित्य आहे. भ्रष्टाचारी व्यक्तीला समाजात मिळणारी प्रतिष्ठा पाहिली की धनाचे वरील प्रतिपादित सूत्र किती खोल आहे हे समजून येते. पुढे तुकोबाराय सांगतात. धन मिळवा, प्रापंचिक गरजा पूर्ण करा पण, आजूबाजूच्या अगतिक, दीन-दुबळ्या बांधवांच्या हितासाठी थोडा तरी उपकार करा.तुका म्हणे फार । थोडा तरी परउपकार ।।मानवी जीवनात जेव्हा लोभ आणि बळ यांचे अमर्याद पूजन होते तेव्हा व्यक्तीला तिच्यातील मानवतेचा विकास करणे शक्य होत नाही.व्यक्तीचा विकास अथवा थोरवी त्याच्याकडे किती बल आहे, किती संपत्ती आहे यावर अवलंबून न राहता वास्तविक तो कशा स्वभावाचा आहे, यावर अवलंबून असते म्हणूनच व्यक्तीचा मोठेपणा हा त्याच्या प्रमाणात्मक निकषांऐवजी गुणात्मक निकषांवर ठरू लागला तर समाज उत्तरोत्तर गुणात्मक निकषांवर विकसित होईल. यावर विश्वास ठेवूनच हा भागवत धर्म आचार-विचार सांभाळतो आहे तसे नसते तर आम्ही पालख्या सत्ताधीशांच्या, संपत्तीधीशांच्याच उचलल्या असत्या आणि आमचे खांदे संपून गेले असते. पण, आज पालख्या उचलल्या जातात ज्यांनी उच्चविचार, आचार आणि साधनेची पेरणी करण्यासाठी आपल्या आयुष्यातील क्षण-क्षण वेचला त्यांच्या पालख्यांचे भोई होण्यासाठी लाखो भागवतवीर आज पालख्यांसोबत प्रवास करत आहे. आज कोणासोबत चार पावले चालावीत हा प्रश्न असताना पालख्यांसोबत शेकडो किलोमीटर चालण्यासाठी श्रद्धावान, चांगुलपणावर श्रद्धा असणाºया माणसांची धडपड चालूच आहे. कारण ही वारी आयुष्याची योग्य वाट दाखवत आहे. कारण...वाट दावी त्यांच्या पुण्या नाही पार । होती उपकार अगणित ।।या कृतज्ञेतूनच सर्वजण पालखीबरोबर चालत आहेत.(लेखक संत साहित्याचेअभ्यासक आहेत.)