वीर सेवा दलाचा सच्चा सैनिक विसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:24 IST2021-05-24T04:24:10+5:302021-05-24T04:24:10+5:30

जेेव्हा सर्वत्र कोरोनाचा कहर होता तेव्हा प्रत्येकाला मास्क व सॅनिटायझर मिळावे यासाठी घरोघरी फिरत होता. कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या ...

The true soldier of the Veer Seva Dal forgot | वीर सेवा दलाचा सच्चा सैनिक विसरला

वीर सेवा दलाचा सच्चा सैनिक विसरला

जेेव्हा सर्वत्र कोरोनाचा कहर होता तेव्हा प्रत्येकाला मास्क व सॅनिटायझर मिळावे यासाठी घरोघरी फिरत होता. कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या कोणालाही रिपोर्ट काढण्यापासून दवाखान्यात दाखल करेपर्यंत झटायचा. त्याने कधीच घराची पर्वा केली नाही. एक कोरोना योद्धा अशी त्याची ओळख आजही जिवंत आहे.

आपल्या सुनील पाटील या भावाला पेपर वितरणाच्या कामातही मोलाची मदत करायचा. कायम सर्वांच्या लक्षात राहणारा हा 'महावीर' आज अवघ्या ३४ वर्षाच्या वयात काळाने हिरावून नेला. घरी खंबीर साथ देणारी अर्धांगिनी, चार वर्षाची व चार महिन्याची दोन चिमुकल्या मुली कायमच्या पोरक्या झाल्या.

फोटो : २३ महावीर पाटील

Web Title: The true soldier of the Veer Seva Dal forgot