शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

हुबळीजवळ ट्रक, खासगी बसचा भीषण अपघात, कोल्हापूरच्या दोघांसह सहाजण ठार, २६ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 11:04 IST

दोन्ही वाहनांची हुबळीजवळ धडक होऊन भीषण दुर्घटना घडली. यामध्ये ट्रक चालक, किन्नरचा जागीच मृत्यू झाला.

कोल्हापूर :  हुबळीजवळ धारवाडच्या तरिहाळा बायपासवर ट्रक आणि खासगी आराम बसची भीषण धडक झाली. या अपघातात सहा जण जागीच ठार झाले. तर २६ जखमी झाले. मध्यरात्री १२ वाजता ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये दोन जण कोल्हापूरचे व दोन कर्नाटक मधील असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.खासगी आराम बस कोल्हापूरहून बंगळूरूकडे निघालेली होती. आराम बस धारवाडजवळ आली असता त्याच वेळी पुण्याहून बंगळूरूकडे ट्रक जात होता. दोन्ही वाहनांची हुबळीजवळ धडक होऊन भीषण दुर्घटना घडली. यामध्ये ट्रक चालक, किन्नरचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील ठार झालेल्या चार प्रवासामध्ये दोन कोल्हापूरचे तर दोन कर्नाटक येथील रहिवासी असल्याचे समजते. या अपघातात २६ जण जखमी झाले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकAccidentअपघात