शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पुराच्या पाण्यात मध्यरात्री ट्रक उलटला; चालक, क्लिनर ट्रकवर जावून बसले, चार तासानंतर सुखरूप बाहेर काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 16:36 IST

बस्तवडे-आणूर दरम्यान १३ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला पुलही पाण्याखाली गेला

म्हाकवे : बॅरिकेट बाजूला करुन पुराच्या पाण्यातून जाताना ट्रक उलटल्याची घटना घडली. प्रसंगावधान राखत चालक व क्लिनर दोघेही ट्रकवर जावून बसले. चार तासानंतर आपत्ती व्यवस्थापन, मुरगूड पोलिसांच्या मदतीने त्या दोघांना सुखरूप बाहेर काढले. बस्तवडे-आणूर दरम्यान मध्यरात्री ही घटना घडली.मुसळधार पावसामुळे पाटगाव चिकोञा धरणातून विसर्ग सुरु असल्याने वेदगंगा नदीने रुद्ररुप धारण केले आहे. बस्तवडे-आणूर दरम्यान चार वर्षांपूर्वी सुमारे १३ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला पुलही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे हा मुख्य रस्ताही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. प्रशासनाने आणुर व बस्तवडेकडील बाजूला बॅरिकेट लावून हा मार्ग पुर्णतः बंद केला आहे. तरीही आज बुधवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास एका ट्रक चालकाने बॅरिकेट बाजूला करून पुराच्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, वळणदार मार्गावर रस्त्याचा अंदाज न आल्याने हा ट्रक रस्त्याच्या पुर्व बाजूला उलटला. प्रसंगावधान राखत चालक व क्लिनर ट्रकवर जावून बसले. चार तासांनंतर आपत्ती व्यवस्थापन, मुरगूड पोलिसांच्या मदतीने त्या दोघांना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, काल मंगळवारी मध्यरात्रीही बानगे येथे एका ट्रक चालकाने बॅरिकेट बाजूला करून पुराच्या पाण्यात ट्रक नेला होता. त्या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते.अडाणीपणा की नसते धाडस?प्रशासनाने आवाहन केले तरीही अनेक ठिकाणी वाहन चालक जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून वाहने घेऊन जातात. दोन्ही बाजूला बॅरिकेट लावून रस्ता का बंद केला असावा याचीही दक्षता न घेण्याइतपत हे चालक अडाणी आहेत का?अशी चर्चाही घटनास्थळी सुरू होती.