शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथी पांडुरंगाने आदमापूर शाळेला दिली लाखाची देणगी, सत्काराने पांडुरंगही भारावला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 11:56 IST

सरवडे : आपण तृतीयपंथी आहोत याची खंत कधी मनात बाळगली नाही. समाजानेही अनेक वेळा अवहेलना केली वाईट बोलणं तर ...

सरवडे : आपण तृतीयपंथी आहोत याची खंत कधी मनात बाळगली नाही. समाजानेही अनेक वेळा अवहेलना केली वाईट बोलणं तर अनेकदा सहन केली. नशीबी आलेले जिणं एक संधी समजून मी जगू लागलो. यातूनच शुभशकुन देण्याच्या  अनुषंगाने आदमापूर गावामध्ये गेले चार वर्ष मी फिरतो. त्यातूनच काही रक्कम जमा झाली. माझाही उदरनिर्वाह करत काही रक्कम आपण सामाजिक कार्यासाठी दिली पाहिजे तेही समाजाचे ऋण आहे हे फेडले पाहिजे  हा दृष्टिकोन ठेवून ज्या ठिकाणीही पैसे मिळवले त्या आदमापूर गावातील शाळेच्या कामासाठी देणगी दिली. असे मत पांडुरंग गुरव यांनी बोलून दाखवले.विद्यामंदिर आदमापुर  शाळेचे गेले तीन वर्षे बांधकाम सुरु आहे. देवदत्त गंगावली यांनी ३० लाखाची देगणी दिली आहे. ग्रामस्थाकडून देणगी गोळा करण्याचे काम सुरु आहे. या नवीन इमारतीचा बांधकाम खर्च अंदाजे एक कोटी इतका आहे.त्या कामासाठी गुरव यांनी देणगी दिली.  त्यावेळी गुरव यांचा शाळा व्यवस्थापन व ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी यांनी सत्कार केला त्यावेळी तो भावुक झाला.चंदगड तालुक्यातील आसगोली हे पांडुरंग गुरव यांचे मूळ गाव आहे. आपण तृतीयपंथी असल्याची खंत मनात न ठेवता जगण्याची एक नवी संधी आहे. यातूनच स्वतःसाठी आणि समाजासाठी जगाचे हे मनी ठेवून  समाजात वावरतो आहे. अनेकदा अवेहला होते.  बोलणे ,टोमणे सोसले आणि अजूनही सोसत आहेच.  शुभ शकुन म्हणून डोके वर हात ठेवला की लोक दहा रुपये देतात ते आनंदाने स्वीकारत आजही आम्ही फिरतो.आदमापुरात संत बाळूमामाच्या पवित्र नगरीत  राज्यभरातून आलेल्या  भक्तांच्या मार्फत मिळालेल्या पैशातून या आदमापुर गावाला सामाजिक कार्यासाठी काही अल्प अशी मदत केली आहे असल्याचे तो सांगतो. देणगी स्वीकारताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनाजी पाटील, मुख्याध्यापक डी.डी.पाटील, एस.डी.खतकर, एस.के.पाटील, तानाजी पाटील उपस्थित होते. देणगीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTransgenderट्रान्सजेंडरSchoolशाळा