वृतपत्र सेवा अखंडपणे देणाऱ्या योद्ध्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:13 IST2021-02-05T07:13:30+5:302021-02-05T07:13:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कोरोना काळात एकाही दिवसाचा खंड न पाडता वृत्तपत्र टाकणाऱ्या कसबा बावड्यातील अचानक न्यूज पेपर ...

वृतपत्र सेवा अखंडपणे देणाऱ्या योद्ध्यांचा सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : कोरोना काळात एकाही दिवसाचा खंड न पाडता वृत्तपत्र टाकणाऱ्या कसबा बावड्यातील अचानक न्यूज पेपर स्टाॅल येथील मुलांचा कोल्हापूर शहर (महानगर) वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे संघटक शंकर चेचर, निवृत्त न्यायाधीश कुंडलिक पाटील, माजी नगरसेवक अशोक जाधव या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कसबा बावडा व्यापारी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक गजानन बेडेकर, उदय कांबळे, योगिराज पाटील, प्रज्वल कुरणे, प्रशील सावंत, जोश पाटोळे, संकेत उलपे, ओमकार सावंत, किशोर वायदंडे, अक्षय चेचर, रविराज चेचर, ऋतुराज चेचर आदी उपस्थित होते.
फोटो : २७०१२०२१-कोल-चेचर
आेळी : कसबा बावड्यातील अचानक न्यूज पेपर स्टाॅल येथील मुलांनी कोरोनाच्या काळात एक दिवसाचीही सुटी न घेता वृत्तपत्र घरोघरी पोहोचविल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे संघटक शंकर चेचर, निवृत्त न्यायाधीश कुंडलिक पाटील, माजी नगरसेवक अशोक जाधव, गजानन बेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.