शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

Kolhapur News: गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण सुरूच ठेवा, उच्च न्यायालयाचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 12:02 IST

२४ जानेवारीपासून लेखापरीक्षण सुरू आहे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश संचालिका शौमिका महाडिक यांच्या तक्रारीनुसार राज्य शासनाने दिले होते. लेखापरीक्षण थांबवावे, यासाठी गोकुळ दूध संघाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच्या गुरुवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने चाचणी लेखापरीक्षण सुरू ठेवण्याचे आदेश दिले. हा सत्ताधाऱ्यांना धक्का मानला जात आहे.गोकुळ दूध संघाचे सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे चाचणी लेखापरीक्षण करावे, अशी मागणी संचालिका महाडिक यांनी कृषी पशुसंवर्धन व दुग्ध विभागाच्या लेखा परीक्षण मंडळाकडे केली होती. त्यानुसार मंडळाने गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण करण्यासाठी अहमदनगरचे विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब मसुगडे यांची नियुक्ती केली आहे. मसुगडे लेखापरीक्षण करीत आहेत. २४ जानेवारीपासून लेखापरीक्षण सुरू आहे. मात्र, या मुद्यावरून संचालिका महाडिक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. सत्ताधारी याविरोधात न्यायालयात गेले आहेत. त्याची सुनावणी सुरू आहे.सुनावणीत गोकुळ दूध संघाचे चाचणी लेखापरीक्षण थांबवण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. पुढील सुनावणीसाठी ८ जूनला होणार आहे. न्यायालयास उन्हाळ्याची सुट्टी असल्याने याबाबतच्या सुनावणीसाठी १ महिन्यानंतरची तारीख देण्यात आली आहे. तोपर्यंत पुढील कार्यवाहीसंदर्भात निर्देश देऊ नयेत, अशा सूचना शासनास दिलेल्या आहेत. गोकुळच्या चाचणी लेखापरीक्षण अहवालाचे कामकाज सुरू ठेवून शासनास अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul MilkगोकुळHigh Courtउच्च न्यायालय