बालिंगे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:17 IST2021-06-28T04:17:18+5:302021-06-28T04:17:18+5:30
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बालिंगे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच मयूर जांभळे यांच्या हस्ते वृक्षाराेपण करण्यात आले. गावातील ...

बालिंगे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बालिंगे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच मयूर जांभळे यांच्या हस्ते वृक्षाराेपण करण्यात आले. गावातील पाण्याची टाकी, स्मशानभूमी, महादेव मंदिर परिसर, आरोग्य उपकेंद्र आदी ठिकाणी दोनशेहून अधिक रोपे लावण्यात आली.
शाहू महाराजांनी दोनशे वर्षांपूर्वी बालिंगे गाव वसवले. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच गाव सुजलाम सुफलाम झाले. आज कोरोनाच्या महामारीत ऑक्सिजनचे महत्त्व सगळ्यांना समजले असून वृक्षांच्या माध्यमातून आपणास मोफत ऑक्सिजन मिळणार असल्याचे सरपंच मयूर जांभळे यांनी सांगितले.
उपसरपंच पंकज कांबळे, तलाठी किरण पाटील, ग्रामपंचायत सदस्य अजय भवड, विजय जांभळे, कृष्णात माळी, संदीप सुतार, धनंजय ढेंगे, युवराज जत्राटे, सचिन माळी, अजित कांबळे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र भगत आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : बालिंगे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच मयूर जांभळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपसरपंच पंकज कांबळे, किरण पाटील, राजेंद्र भगत, अजय भवड आदी उपस्थित होते. (फोटो-२७०६२०२१-कोल- बालिंगे)