संत गजानन रुग्णालयात ‘म्युकरमायकोसिस’वर उपचाराची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST2021-06-17T04:17:26+5:302021-06-17T04:17:26+5:30

चव्हाण म्हणाले, रुग्णालयात यासाठी ५ स्वतंत्र बेडची सोय करण्यात आली आहे. इ. एन. टी. डॉक्टरांच्या कमतरतेमुळे या शस्त्रक्रियेसाठी सध्या ...

Treatment facility for ‘Mucormycosis’ at Sant Gajanan Hospital | संत गजानन रुग्णालयात ‘म्युकरमायकोसिस’वर उपचाराची सोय

संत गजानन रुग्णालयात ‘म्युकरमायकोसिस’वर उपचाराची सोय

चव्हाण म्हणाले, रुग्णालयात यासाठी ५ स्वतंत्र बेडची सोय करण्यात आली आहे. इ. एन. टी. डॉक्टरांच्या कमतरतेमुळे या शस्त्रक्रियेसाठी सध्या केवळ केएलई बेळगाव, डी. वाय. पाटील व सीपीआर कोल्हापूर येथील रुग्णालयात सोय आहे. परंतु, ही सोय आता गजानन रुग्णालयात पूर्णत: मोफत उपलब्ध झाली आहे.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून कोरोना काळात तब्बल ६०० हून अधिक रुग्णांना मोफत उपचार देण्यात आले. वेगवेगळ्या विभागातील ४५० हून अधिक रुग्णांनी या योजनेतून मोफत उपचाराचा लाभ घेतला. कोरोनाच्या काळात १७५ हून अधिक सिझेरियन प्रसूती, मूत्ररोगाचे १३२, नवजात शिशू विभागातील ८२ तसेच ‘आयसीयू’मधील इतर आजारांवरील ५० शस्त्रक्रिया व उपचार यशस्वी व मोफत केल्या आहेत.

दरम्यान डॉ. सुभाष नांगरे, राहुल तंवर, डॉ. किरण कुंडलकर, डॉ. चेतन खाडे या जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टिमने हॉस्पिटलला भेट दिली. रुग्णांवरील उपचार आणि व्यवस्थापनाची माहिती घेतली. रुग्णालयातील सुसज्ज यंत्रणेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

कोविड केंद्र व रुग्णालयात डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. गौरव बाबर, डॉ. आशुतोष गावकर, डॉ. सुप्रिया मुधोळकर, डॉ. रूपाली कोरी, डॉ. मंगल मोरबाळे, डॉ. माधव पठाडे यांच्यासह इतर तज्ज्ञ डॉक्टर्स व कर्मचारी सेवा देत आहेत.

----------------------

नॉन कोविड रुग्णांना आवाहन

‘संत गजानन’च्या कोविड केंद्रात आतापर्यंत १६२ बाधितांनी उपचार घेतले आहेत. उत्कृष्ट सेवेमुळे येथील मृत्यूदर कमी असून अधिकाधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. योजनेतून ८२ रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत. नॉन कोविड नियमित रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग असल्याने रुग्णांनी न घाबरता इतर आजारांवरील मोफत शस्त्रक्रिया व उपचाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. चव्हाण यांनी केले आहे.

Web Title: Treatment facility for ‘Mucormycosis’ at Sant Gajanan Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.