शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: उसनवार घेतलेल्या साडेबारा लाखांसाठी पळवली ५० लाखांची ट्रॅव्हल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 13:58 IST

पैसे परत मिळाल्याशिवाय ट्रॅव्हल्स देणार नाही, असे सांगून धमकावले

कोल्हापूर : हातउसने घेतलेले साडेबारा लाख रुपये वेळेत परत न दिल्याने थेट ५० लाखांची ट्रॅव्हल्स ओढून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली. हा प्रकार २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान घडला. ट्रॅव्हल्स व्यावसायिक सिकंदर आप्पालाल पठाण (वय ५३, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार मिलिंद देशपांडे (रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) यांच्यासह अन्य अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिकंदर पठाण हे खासगी ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करतात. त्यांनी गेल्या काही महिन्यांत इस्लामपूर येथील मिलिंद देशपांडे यांच्याकडून हातउसने साडेबारा लाख रुपये घेतले होते. ते पैसे परत मिळावेत, यासाठी देशपांडे यांच्याकडून तगादा सुरू होता. मात्र, वेळेत पैसे परत मिळत नसल्याने तुमची ट्रॅव्हल्स ओढून नेऊ, अशी धमकी देशपांडे यांनी वेळोवेळी दिल्याचे पठाण यांनी सांगितले.

पठाण यांनी गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांची ट्रॅव्हल्स राजर्षी शाहू मार्केट यार्ड येथील रिकाम्या जागेत पार्क केली होती. शनिवारी सकाळी त्यांची ट्रॅव्हल्स मिलिंद देशपांडे यांच्या सांगण्यावरून अनोळखी दोघांनी पळवून ती कामेरी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील त्यांच्या पेट्रोलपंपावर लावल्याची माहिती पठाण यांना मिळाली.पठाण यांनी शनिवारी दुपारी जाऊन देशपांडे यांच्याकडे ट्रॅव्हल्सची मागणी केली. मात्र, माझे पैसे परत मिळाल्याशिवाय ट्रॅव्हल्स देणार नाही, असे सांगून धमकावले. याबाबत पठाण यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने कामेरी येथील पेट्रोलपंपावरून ट्रॅव्हल्स ताब्यात घेतली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस