शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: सरपणाच्या पोत्यांखालून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक, सव्वा कोटीचा मुद्देमाल जप्त

By उद्धव गोडसे | Updated: November 1, 2023 16:17 IST

कोल्हापूर : सरपणाच्या पोत्यांखाली लपवून ७० लाख ८० हजार रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणारा ट्रक राज्य उत्पादन ...

कोल्हापूर : सरपणाच्या पोत्यांखाली लपवून ७० लाख ८० हजार रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडला. ही कारवाई ओसरगाव (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथे बुधवारी (दि. १) सकाळी झाली. ट्रकचालक लक्ष्मण अर्जुन ढेकळे (वय ३४, रा. सुपने, ता. कराड, जि. सातारा) याला पथकाने अटक केली. कोकणात सलग दोन दिवस विभागीय भरारी पथकाने सापळा रचून केलेल्या कारवाईत एक कोटी ४३ लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त केली.गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक कणकवलीमार्गे होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पंकज कुंभार यांना मिळाली होती. त्यानुसार अधिका-यांनी बुधवारी पहाटे कणकवली तालुक्यात सापळा लावला होता. ओसरगाव येथे संशयित वाहनांची झडती घेताना एका ट्रकमध्ये सरपणाची पोती आढळली. पोती हटवल्यानंतर त्याखाली गोवा बनावटीच्या दारूचे ११५२ बॉक्स लपवल्याचे निदर्शनास आले. पथकाने ट्रकचालक लक्ष्मण ढेकळे याला अटक करून ७० लाख ८० हजार ३६० रुपयांचा दारूसाठा आणि ५५ लाखांचा ट्रक असा एक कोटी २६ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. निरीक्षक कुंभार यांच्यासह दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, एस. एस. गोंदकर, कॉन्स्टेबल सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, योगेश शेलार, राहुल सपकाळ यांच्या पथकाने कारवाई केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस