विकासकामांतून गावागावांचा कायापालट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:30 IST2021-09-14T04:30:18+5:302021-09-14T04:30:18+5:30
सेनापती कापशी : ग्रामविकास खाते ही विकासाची गंगा आहे. गट-तट न मानता विकासकामांच्या माध्यमातून गावागावांचा कायापालट करा, असे आवाहन ...

विकासकामांतून गावागावांचा कायापालट करा
सेनापती कापशी : ग्रामविकास खाते ही विकासाची गंगा आहे. गट-तट न मानता विकासकामांच्या माध्यमातून गावागावांचा कायापालट करा, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
हसूर बुद्रुक (ता. कागल) येथे विविकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे होते.
गावात २५:१५ योजनेंतर्गत अंतर्गत रस्ते, अंतर्गत गटर्स, जुनी चावडी ते माळवाडी रस्ता, अंगणवाडी इमारत, रस्ते खडीकरण, काँक्रीटीकरण - या ५५ लाखांच्या कामांचे उद्घाटन झाले. मंजूर झालेल्या अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकणांतर्गत रस्ते, हाफ राउंड व आरसीसी गटर्स, अंतर्गत रस्ते अशा ३५ लाखांच्या कामाचे भूमिपूजन झाले, तसेच पंतप्रधान सडक योजनेतून गावातून कामत रस्ता-पावणेदोन कोटी, ग्रामसचिवालय -५२ लाख, नळ पाणीपुरवठा योजना -३२ लाख, शाळा इमारत सुधारणा -पाच लाख, अशा एकूण २ कोटी ६४ लाखांच्या कामांचा प्रारंभ झाला.
शशिकांत खोत, हसूर खुर्दचे माजी सरपंच अंकुश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर माजी सरपंच ज्ञानदेव जाधव, माजी सरपंच बाबूराव भोसले, डी. व्ही. शिंदे, दीपक सोनार, मनोज वास्कर, धनाजी तोरस्कर, गिरीश कुलकर्णी, मधुकर नाईक आदी उपस्थित होते.
स्वागत उपसरपंच पुरुषोत्तम साळोखे यांनी केले. प्रास्ताविक शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संभाजी भोकरे यांनी केले.
फोटो:- हसूर बुद्रुक (ता. कागल) येथे ग्रामसचिवालयाची पायाभरणी करताना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, शशिकांत खोत, अंकुश पाटील, उपसरपंच पुरुषोत्तम साळोखे व इतर मान्यवर.