सुंदर बागेचा कायापालट करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:41 IST2020-12-15T04:41:23+5:302020-12-15T04:41:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : नगरपालिकेने उत्पन्न वाढीच्यादृष्टीने खाद्यपदार्थ विक्रीचे गाळे बांधताना त्याठिकाणी आवश्यक त्या सोयी उपलब्ध केल्या नाहीत. ...

सुंदर बागेचा कायापालट करावा
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : नगरपालिकेने उत्पन्न वाढीच्यादृष्टीने खाद्यपदार्थ विक्रीचे गाळे बांधताना त्याठिकाणी आवश्यक त्या सोयी उपलब्ध केल्या नाहीत. त्यामुळे शहरातील सुंदर बाग ही कचरा कोंडावळी बनत चालली आहे. जहागीरदार घोरपडे-सरकार यांनी ज्या उद्देशाने बागेची निर्मिती केली, ते स्वप्न अबाधित राखण्यासाठी नगरपालिकेने वेळीच पावले उचलून या बागेचा कायापालट करावा, अशा मागणीचे निवेदन सुंदर बाग बचाव समितीने नगराध्यक्षा अलका स्वामी व मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना दिले.
निवेदनात, काही वर्षांपूर्वी पालिकेने या बागेच्या ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रीचे गाळे काढून उत्पन्नवाढीचे स्रोत अमलात आणले; परंतु गाळे बांधताना आवश्यक सोयी उपलब्ध करून न दिल्याने ही बाग कचरा कोंडाळा बनू लागली आहे. तरी याकडे लक्ष देऊन नावारूपाप्रमाणे सुंदर बागेची निर्मिती करावी, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात सुभाष मालपाणी, तारानाथ मट्टीकल्ली, रविराज बुगड, आदींचा समावेश होता.