शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
2
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
3
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
4
2029 मध्ये कोण असेल भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार? अमित शाहंनी नावही सांगितलं...
5
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
6
Video: भीषण! मुंबईत पेट्रोल पंपावर भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं, लोक अडकले; पार्किंग टॉवरही जमीनदोस्त 
7
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
8
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
9
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
10
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
11
IRE vs PAK : Babar Azam चा ट्वेंटी-२० मध्ये विश्वविक्रम; रोहित-धोनीलाही टाकलं मागं
12
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
13
आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडाखा; 300हून अधिक लोकांचा मृत्यू
14
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
15
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
16
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात
17
VIDEO : हे कोण... आपण कोण...? महिलांचे हिजाब वर करून बघू लागल्या माधवी लता! FIR दाखल
18
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
19
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
20
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला

Kolhapur: शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांची तडकाफडकी बदली

By समीर देशपांडे | Published: February 16, 2024 4:24 PM

कोल्हापूर : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांची तडकाफडकी बदली करण्यात आली ...

कोल्हापूर : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोगचिकित्साशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. एस. एस. मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या न्यूटन कंपनीने बनावट नोंदणी पत्राच्या आधारे सीपीआर हॉस्पिटलला साहित्य पुरवठा केला होता. हे प्रकरण 'लोकमत'ने उघडकीस आणले. यावरून शिवसेना ठाकरे गटाने जोरदार आंदोलन केले होते. यानंतर डॉक्टर प्रकाश गुरव यांनी याबाबत पोलिसात फिर्याद देण्याची ग्वाही दिली. मात्र सही न करता पोलीस स्टेशनला पत्र दिले होते आणि ते रजेवर गेले होते. यानंतर तिसऱ्याच दिवशी डॉक्टर गुरव यांची तडकाफडकी बदली करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.त्यांच्या जागी डॉक्टर मोरे यांची नियुक्ती करण्यात आली असून सीपीआर मधील अधिष्ठातापद हे गेल्या अनेक वर्षांपासून संगीत खुर्चीचा खेळ बनला आहे हे निश्चित. न्यूटन कंपनीला कागदपत्रांची छाननी करता दिलेली निविदा वादाच्या भोवऱ्यात सापडली असून 'लोकमत'ने हे प्रकरण उघडकीस आणले होते. या विरोधात विविध संघटनांनी निवेदने दिली असून पोलीस कारवाई करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टर गुरव यांच्या तडकाफडकी झालेल्या बदलीने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयTransferबदली