दत्तवाड ग्रामविकास अधिकाऱ्यांची बदली करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:24 IST2021-03-16T04:24:41+5:302021-03-16T04:24:41+5:30

दत्तवाड ग्रामपंचायतीमधील डिसेंबर-जानेवारी या दोन महिन्यांत प्रशासकीय काळात झालेल्या विविध खरेदी व विकासकामात भ्रष्टाचार झाला असून त्याच्या चौकशीची मागणी ...

Transfer Dattawad Village Development Officer | दत्तवाड ग्रामविकास अधिकाऱ्यांची बदली करा

दत्तवाड ग्रामविकास अधिकाऱ्यांची बदली करा

दत्तवाड ग्रामपंचायतीमधील डिसेंबर-जानेवारी या दोन महिन्यांत प्रशासकीय काळात झालेल्या विविध खरेदी व विकासकामात भ्रष्टाचार झाला असून त्याच्या चौकशीची मागणी यापूर्वीच ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली होती. त्या चौकशीनंतर कांबळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी (दि. १२) ग्रामपंचायत मासिक बैठकीमध्ये सदस्यांनी दोन महिन्यांच्या कालावधीत झालेल्या अतिरिक्त खर्चाचे पैसे भरावेत, अशी मागणी ग्रामविकास अधिकारी कांबळे यांच्याकडे केली. यातून बैठकीमध्ये वादावादीही झाली. त्यानंतर कांबळे हे बैठक अर्धवट सोडून निघून गेले. ग्रामपंचायत सदस्यांनी याची माहिती विस्तार अधिकारी रवींद्र कांबळे व गटविकास अधिकारी कवितके यांना दिली. शनिवार, रविवार सुटी असल्याने ग्रामपंचायत कामकाज बंद होते. दरम्यान, सोमवारी ग्रामपंचायत सदस्यांनी शिरोळ येथे गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन कांबळे यांची त्वरित बदली करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर सरपंच चंद्रकांत कांबळे, नाना नेजे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Transfer Dattawad Village Development Officer