शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात रेल्वे मालगाडीचा डबा उलटला, सहा जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 14:53 IST

रेल्वे स्थानकात पार्किंग यार्डमध्ये एका रेल्वे डब्याला आग लागल्याच्या घटनेला काही तास उलटले नसतानाच रेल्वे अपघाताची दुसरी घटना घडली आहे. मार्केट यार्ड परिसरात रेल्वे मालगाडीचा डबा उलटल्याची घटना घडली आहे

कोल्हापूर : रेल्वे स्थानकात रेल्वे डब्याला आग लागल्याची घटना ताजी असतानाच काही तासातच मार्केटयार्ड मधील रेल्वे गुड्समध्ये मालगाडीतील सिमेंट पोती उतरताना एक बोगी उलटल्याची घटना घडली. यात सहा हमाल जखमी झाले. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. सोमवारी दुपारी साडे बाराच्या दरम्यान ही दुर्घटना घडली.सुरेश पांडुरंग सांडूगडे (वय-41), सिराज शब्बीर आदालखान (30), राजू पंडित गेंड (28), सनीउल्ला नानीउल्ला चमनशेख (41), सादिक शब्बी शेख (45) मुजाहिद्दीन इम्तिहाज मुजावर (45, सर्व रा. विक्रमनगर, कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोल्हापुरात मार्केट यार्ड मधील गुड्स मार्केट मध्ये रविवारी रात्री रेल्वे लाईन नंबर तीनवर सिमेंटची पोती भरून आलेली मालगाडी थांबली होती. सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास या रेल्वे मालवाहतूक बोगीतील सिमेंटची पोती उतरण्याचे काम सुरू होते. बोगीतील 1397 पैकी फक्त साडेतीनशे सिमेंट उतरणे बाकी असताना बोगी उलट दिशेला उलटली. यावेळी बोगीतील सहा हमाल या पोत्याखाली अडकले.घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. इतर हमालांनी त्याखाली दबलेल्या हमालांना बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर शहर पोलीस उपाध्यक्ष मंगेश चव्हाण,  करवीर पोलीस उपाधीक्षक संकेत गोसावी, शाहुपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी यांच्यासह लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी काळे, निरीक्षक आर यादव यांच्यासह पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वेAccidentअपघात