शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
2
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
3
पीएम मोदींच्या महत्त्वाकांशी योजनेला ख्वाडा? जन-धन योजनेबाबत चिंताजनक बातमी, तुमचं खातं बंद होणार का?
4
EV चार्जिंगशी निगडीत कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; सोनू सूदशी निगडीत आहे कंपनी, ₹१२५ वर आला भाव
5
VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती
6
मुंबईत महिलेवर हल्ला केला आणि कोकणात जाऊन लपला, ४८ वर्षांनी झाली अटक, असा सापडला आरोपी
7
"पप्पांना मारलंय... "; लेकानेच केला खुनी आईचा पर्दाफाश; भाच्याच्या प्रेमात घेतला नवऱ्याचा जीव
8
Video - "मला माफ करा..."; तिकीट नाकारल्यानंतर ढसाढसा रडला नेता, व्यक्त केलं दु:ख
9
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
10
सासरेबुवा घरी घेऊन आले २ सूना; लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच झाल्या गायब अन्... समोर आलं धक्कादायक सत्य
11
Video : सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला, गॅलरीमध्ये रंगल्या गप्पा, भेटीचं कारण काय?
12
दर महिना ७० हजार सॅलरी पण हाती शिल्लकच राहत नाही; टेक प्रोफेशनल युवकानं शेअर केला अनुभव
13
Platinum Investment: सोने-चांदीच्या किंमती आवाक्याबाहेर, प्लॅटिनममध्ये गुंतवणूक करणे चांगला पर्याय आहे का?
14
Video: हायकोर्टच्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान वकीलाचा महिलेला Kiss; व्हिडिओ व्हायरल...
15
Virat Kohli Property: विराट कोहलीने ८० कोटीच्या बंगल्याची भावाला दिली 'पॉवर ऑफ अटॉर्नी'? काय आहे हा दस्तऐवज?
16
VIRAL : बाब्बो! ९३व्या वर्षी बाबा झाला हा व्यक्ती; बायको ५६ वर्षांनी लहान! लगेच दुसऱ्या बाळाचाही विचार केला सुरू
17
Virat Kohli: "ज्यावेळी तुम्ही हार मानता..." किंग कोहलीची पोस्ट चर्चेत; जाणून घ्या सविस्तर
18
थकलेले चेहरे, कंटाळवाणा मूड.. विराट-रोहितसह सारेच हैराण! ऑस्ट्रेलियात पोहचण्याआधी काय घडलं?
19
जगातील नकाशात कुठे आहे रहस्यमय 'टोरेंजा' देश?; महिलेचा पासपोर्ट पाहून खळबळ, व्हिडिओ व्हायरल
20
TVS ने लॉन्च केली पहिली दमदार अ‍ॅडव्हेंचर टूरिंग बाईक; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत...

ST Strike: कोल्हापूर जिल्ह्यातील एसटी वाहतूक व्यवस्था कोलमडली, प्रवाशांचे हाल

By सचिन यादव | Updated: September 3, 2024 19:39 IST

कोल्हापूर : विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा फटका एसटीच्या कोल्हापूर विभागाला बसला. मध्यवर्ती बसस्थानक, संभाजीनगर, रंकाळा बसस्थानकासह बारा ...

कोल्हापूर : विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा फटका एसटीच्या कोल्हापूर विभागाला बसला. मध्यवर्ती बसस्थानक, संभाजीनगर, रंकाळा बसस्थानकासह बारा आगारातील वाहतूक व्यवस्था कोलमडली. दुपारी बारा वाजेपर्यंत प्रवासी वाहतूक सुरळीत होती. मात्र दुपारनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी संपात उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने मध्यवर्ती बसस्थानकासह जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन द्या, प्रलंबित महागाई भत्ता फरक द्यावा, वार्षिक वेतनवाढीचा फरक द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी संघटनांनी संप पुकारले आहे. त्याला कोल्हापूर जिल्ह्यातील एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने पाठिंबा दिला.दुपारी बारानंतर कर्मचाऱ्यांनी या संपात उत्स्फूर्तपणे सहभाग घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे दुपारनंतर मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली. प्रवाशांची गर्दी अधिक आणि एसटीची संख्या कमी असे चित्र सायंकाळी उशिरापर्यंत कायम राहिले. प्रवासी वर्ग खासगी आराम बस वाहतुकीकडे वळला. त्याचा आर्थिक फटकाही प्रवाशांना सहन करावा लागला.

मुंबईला जाण्यासाठी दुपारी एक वाजल्यापासून प्लॅटफॉर्मवर थांबून होतो. मात्र चार वाजेपर्यंत एकही एसटी आली नाही. त्यामुळे अन्य वाहनाने प्रवास करावा लागला. - रमाकांत देसाई, प्रवासी 

दिवसभरात २० हजार किलोमीटरचा प्रवास थांबला. विविध मार्गांवरील ४०० फेऱ्या रद्द करण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत ही स्थिती कायम होती. उद्यापासून वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे. - संतोष बोगरे, विभागीय वाहतूक अधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरST Strikeएसटी संप