गारगोटी-पाटगाव रस्त्यावर वाहतूक धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST2021-06-17T04:17:21+5:302021-06-17T04:17:21+5:30

गारगोटी-पाटगाव महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असल्याने हा रस्ता दळण-वळणासाठी धोकादायक झाला आहे. शहरातील स्थानिक पुढाऱ्यांनी कामात अनेक वेळा ...

Traffic is dangerous on Gargoti-Patgaon road | गारगोटी-पाटगाव रस्त्यावर वाहतूक धोकादायक

गारगोटी-पाटगाव रस्त्यावर वाहतूक धोकादायक

गारगोटी-पाटगाव महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असल्याने हा रस्ता दळण-वळणासाठी धोकादायक झाला आहे. शहरातील स्थानिक पुढाऱ्यांनी कामात अनेक वेळा अडथळा निर्माण केल्याने ही अवस्था झाल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. शहरात प्रवेश करण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने या मार्गावर आता प्रवाशांची गर्दी होत आहे. शहरातील मुख्य पाईपलाईनचे काम गेली १५ दिवस सुरू होते. यामुळे नागरिकांना पिण्याची पाण्याची समस्या निर्माण झाली होती. या मार्गावरून जनावरांना वैरण आणणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. त्या शेतकरी लोकांना याचा त्रास होत आहे. हा रस्ता एक बाजूला सिमेंटचा पूर्ण झाला आहे, तर दुसरी बाजू अपूर्ण असल्याने रस्त्यावर वाहन चालवताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे रस्त्याचे काम संबंधित विभागाने लवकर पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला राजी करावे, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.

Web Title: Traffic is dangerous on Gargoti-Patgaon road