कामगार संघटना कृती समितीची आज बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:25 IST2020-12-29T04:25:08+5:302020-12-29T04:25:08+5:30

रंकाळा परिक्रमेचे गुरुवारी आयोजन लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : रंकाळा संवर्धन व संरक्षण समिती, अंबाबाई भक्त मंडळ यांच्या वतीने ...

Trade union action committee meeting today | कामगार संघटना कृती समितीची आज बैठक

कामगार संघटना कृती समितीची आज बैठक

रंकाळा परिक्रमेचे गुरुवारी आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : रंकाळा संवर्धन व संरक्षण समिती, अंबाबाई भक्त मंडळ यांच्या वतीने गुरुवारी (दि. ३१) रंकाळा परिक्रमेचे आयोजन केल्याची माहिती अंबाबाई भक्त मंडळ (मोफत अन्नछत्र)चे अध्यक्ष संजय साळोखे यांनी पत्रकातून दिली. सकाळी सहा वाजता परिक्रमेची सुरुवात होणार असून, रंकाळा तलावाभोवती किमान एक, तर कमाल पाच फेऱ्या पूर्ण करून परिक्रमेत सहभाग घेता येणार आहे. ‘चालू या आरोग्यासाठी स्वच्छ सुंदर रंकाळ्यासाठी’ हा संदेश घेऊन परिक्रमा पूर्ण करायची आहे. परिक्रमेत मोफत आयोजन असून, मास्क व सामाजिक अंतर पाळायचे आहे. याबाबत आयाेजित केलेल्या बैठकीला धोंडिराम चोपडे, राजेंद्र पाटील, अमोल गायकवाड, नाना गवळी, विकास जाधव, अजित मोरे, परशराम नांदवडेकर,प्रा. एस. पी. चौगले, आदी उपस्थित होते.

Web Title: Trade union action committee meeting today