शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जोतिबाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या शेतमजुरांची ट्रॅक्टर ट्रॉली उलटली; एक ठार, 20 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 20:37 IST

ज्योतिबा डोंगरावर देवदर्शन घेऊन गावाकडे परतत असताना भाविकांची ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यापासून पंधरा फूट खोल दरीत कोसळून दुर्घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर

ज्योतिबा डोंगरावर देवदर्शन घेऊन गावाकडे परतत असताना भाविकांची ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यापासून पंधरा फूट खोल दरीत कोसळून दुर्घटना घडली. या अपघातात एक ठार तर 20 जण जखमी झाले. ही घटना सादळे मादळे नजीक कासारवाडी घाटात  रविवारी सायंकाळी घडली. मृत व जखमी हेकोरेगाव (ता. वाळवा, जि.सांगली) येथील ऊसतोडणी कामगार आहेत. अशोक शंकर गावडे (वय 55) असे ठार झालेल्याचे नाव आहे. जखमींची नावे अशी, सुजल राजाराम भोसले (वय 10), रफिक बाबु बैल जमादार 52 महादेव साधू शिंदे (55), पोपट पाटील (45) लक्ष्मण बाळकृष्ण कापडे (40 सर्व राहणार कोरेगाव सांगली) 

वारणा सहकारी साखर कारखाना येथे ऊस तोडणी हंगामाची रविवारी सांगता झाल्यानंतर हे सर्व ऊस तोडणी मजूरांचा फड दोन ट्राँलीतून ज्योतिबा डोंगरावर देवदर्शनासाठी गेले होते. सायंकाळी दोन ट्रॅक्टर ट्रॉलीतुन सुमारे 22 ते 25 तोडणी कामगार कोरेगाव (सांगली) कडे जात होते. त्या दरम्यान  कोरेगाव घाटात ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर व दोन ट्राँली रस्ता सोडून सुमारे पंधरा फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात किमान वीस ते बावीस जण गंभीर जखमी झाले. तर एक जण जागीच ठार झाल्याची माहिती आहे. सर्व जखमींना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच जखमींच्या नातेवाइकांनी सीपीआर रुग्णालयात धाव घेतली. सीपीआर रुग्णालयात जखमेवर उपचार करताना डॉक्टरांची तारांबळ उडाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी