कोल्हापूर : कोरोना नियंत्रणासाठी लागू केलेला लॉकडाऊन काही प्रमाणात सरकारने शिथील केल्याने दुसऱ्या दिवशी मंगळवारी शहर पुन्हा पूर्व पदावर येत राहिले. शहराचे अर्थचक्र फिरण्यास सुरूवात झाले. बाजारपेठेत विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. वाहनांची वर्दळी वाढली. यामुळे शहरातील प्रमुख चौक, रस्ते गजबजलेले राहिले.लॉकडाऊन शिथील केल्यामुळे अत्यावश्यक सेवा आणि वस्तू विक्रीची दुकाने सकाळी ११ ऐवजी दुपारी चारपर्यंत सुरू ठेवण्याची मुबा मिळाली. पावसाळा तोंडावर आला आहे. यामुळे पेरणीसाठी विविध प्रकारचे बियाणे आणि पावसापासून बचाव करण्यासाठी छत्री, रेनकोट, ताडपत्री असे साहित्य खरेदीसाठी लगबग दिसत होती.दुकानदारांनीही सोशल डिस्टन्स ठेवून साहित्य देण्याचे नियोजन केले आहे. येथील लक्ष्मीपुरी, राजारामपुरी आदी ठिकाणी भाजीपाला, फळे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. लक्ष्मीपुरीतील धान्य, मिरची बाजारात पगारदार मंडळी पावसाळ्यासाठीचे धान्य खरेदी करताना दिसत होती.
शहर पूर्वपदाकडे, वाहनांची वर्दळ वाढली, पावसाळी साहित्य खरेदीसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 17:03 IST
CoronaVirus Kolhapur : कोरोना नियंत्रणासाठी लागू केलेला लॉकडाऊन काही प्रमाणात सरकारने शिथील केल्याने दुसऱ्या दिवशी मंगळवारी शहर पुन्हा पूर्व पदावर येत राहिले. शहराचे अर्थचक्र फिरण्यास सुरूवात झाले. बाजारपेठेत विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. वाहनांची वर्दळी वाढली. यामुळे शहरातील प्रमुख चौक, रस्ते गजबजलेले राहिले.
शहर पूर्वपदाकडे, वाहनांची वर्दळ वाढली, पावसाळी साहित्य खरेदीसाठी गर्दी
ठळक मुद्देशहर पूर्वपदाकडे, वाहनांची वर्दळ वाढली पावसाळी साहित्य खरेदीसाठी गर्दी